AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात मोठं ट्विस्ट; महादेव गित्तेचा मोठा गौप्यस्फोट

तुरुंगामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची बातमी समोर आली होती, मात्र आता या प्रकरणात महादेव गित्तेच्या वक्तव्यानं मोठं ट्विस्ट निर्माण झालं आहे.

वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात मोठं ट्विस्ट; महादेव गित्तेचा मोठा गौप्यस्फोट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 31, 2025 | 5:47 PM
Share

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं. या प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे सध्या बीडच्या कारागृहात आहेत. त्यांना तिथे मारहाण झाल्याची बातमी समोर आली होती.  वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना  महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचं बोललं जात होतं. मात्र  बीड जिल्हा कारागृहाकडून कराड -घुलेला झालेल्या मारहाणीचं वृत्त फेटाळून लावण्यात आलं आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नाही, असं तुरुंग प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

मात्र या घटनेनंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला दुसरीकडे हलवण्यात आलं आहे. महादेव गित्तेची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी बोलताना माहदेव गित्तेनं मोठं वक्तव्य केलं आहे.

गित्तेचा दावा काय? 

वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना तुरुंगात महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचं बोललं जात होतं. मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं स्पष्टीकरण तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर लगेचच आता  बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला दुसरीकडे हलवण्यात आलं आहे. महादेव गित्तेची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात करण्यात आली आहे. यावेळी बोलताना त्याने मोठा दावा केला आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाली आहे. मारहाण करून आम्हालाच छत्रपती संभाजीनगरला पाठवलं जात आहे. या प्रकरणात अक्षय भैय्याचा काहीही संबंध नाही, असं गित्ते याने म्हटलं आहे.

तुरुंग प्रशासनानं मारहाणीचं वृत्त फेटाळलं

दरम्यान या सर्व प्रकरणात तुरुंग प्रशासनाकडून प्रेसनोट जारी करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याच्या बातम्या सुरू आहेत, मात्र असा कोणताही प्रकार घडला नासल्याचं तरुंग प्रशासनाने म्हटलं आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या