‘माझ्या पराभवानंतर 2 डझन आमदार-खासदार झाले, पण मी पात्र नाही’, पंकजा मुंडे मोठी भूमिका घेण्याच्या तयारीत?

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज केलेल्या धडाकेबाज भाषणात तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'माझ्या पराभवानंतर 2 डझन आमदार-खासदार झाले, पण मी पात्र नाही', पंकजा मुंडे मोठी भूमिका घेण्याच्या तयारीत?
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 4:34 PM

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत आल्या आहेत. पंकजा यांनी नुकतंच दिल्लीत केलेल्या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा झालेली. त्यानंतर त्यांनी आज दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथ गडावर जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. पंकजा मुंडे यांचा 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर राज्यात विधान परिषद, राज्यसभेच्या खासदारकीच्या निवडणुका पार पडल्या. पण त्यामध्ये पंकजा यांना संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीवेळी पंकजा यांच्या उमेदवारीची चर्चा झाली. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. अखेर पंकजा यांच्या संयमाचा बांध आज फुटला. त्यांनी आज धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी आपण भापन नेते अमित शाह यांना भेटणार असल्याचं सांगितलं.

‘अनेक बंदूका माझ्या खांद्यावर विसावायचा प्रयत्न करत आहेत, पण…’

“माझ्या माध्यमातील हितचिंतकांनो आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनो, मला जर भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुंडे अशीच तुम्हाला बोलवेल आणि तुमच्यासमोर भूमिका जाहीर करेल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालणारे खांदे अजून मला मिळालेले नाही. मात्र, माझ्या खांद्याची रुंदी एवढी मोठी आहे की, अनेक बंदूका माझ्या खांद्यावर विसावायचा प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांना विसावू देणार नाही”, असं पंकजा म्हणाल्या.

‘4 वर्षात 2 डझन आमदार-खासदार झाले, त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर’

“पंकजा मुंडे राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोकपणे घेईल. आज 3 जून 2023 पर्यंत ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या भूमिकांशी मी प्रामाणिक आहे. लोकांमध्ये, माध्यांमध्ये, विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची संधी मी दिलेली नाही. अनेक लोकं निवडणुका हरले, पण त्यांना संधी दिली गेली. गेल्या 4 वर्षात कदाचित 2 डझन आमदार-खासदार झाले, त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर लोकं चर्चा करणार. ही चर्चा मी ओढवलेली नाही. कारण माझ्या मनात दाट विश्वास आहे”, असं पंकजा म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

‘मी अमित शाह यांच्याशी बोलणार’

“माझा नेता अमित शाह आहे. मी त्यांची भेट घेणार आहे. मी त्यांचा वेळ मागितला आहे. त्यांच्याशी मी मनमोकळेपणाने बोलणार आहे. त्यांना विचारणार आहे. कारण माझे वडील आता जीवंत नाहीयत. माझं नेतृत्व करावं असा व्यक्ती मला सापडलाय. मी त्यांच्याशी बोलणार आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“माझे हिचिंतक खूप आहेत. सगळेच आहेत. सगळ्याच पक्षात आहेत. आतापर्यंत जे बोलले त्यांचे मी आभार मानते. मी रडगाणे गाणारी नाही. मला आज तुमच्या सर्वांसमोर स्पष्टपणे सांगायचं आहे, तुमचं प्रेम, दिशा आणि दशा हेच माझं राजकारण ठरणार आहे”, असं पंकजा म्हणाल्या.

‘ज्यांना संधी मिळाली ते संयमाचा सल्ला देतात’

“आता चार वर्ष झाले मी आमदारकीची निवडणूक हरले. ज्याचं माझ्यावर प्रेम आहे ते माझी चिंता करतात. ज्यांना वाटतं पंकजामध्ये गुण आहेत त्यांना पंकजाने आपल्याजवळ असलं पाहिजे, असं वाटतं. मी त्यांचा सन्मानच करते. ज्यांना संधी चालून येते ते संयमाने वागण्याचा सल्ला देतात. माझ्या जीवनात संयमाशिवाय काहीच महत्त्वाचं नाही. एवढा संयम मी माझ्या आयुष्यात ठेवला”, असंही पंकजा म्हणाल्या.

“माझ्या चेहऱ्याकडे बघा. कुठे नाराजी दिसते का? माझा बाप एवढा मोठा राहिला. त्यांच्यापेक्षा मोठं कुणी असेल तर अपेक्षा करेन, मी लहान माणसांकडे काय अपेक्षा करु? माझी कुणाकडे अपेक्षा नाही. फक्त तुमच्याकडे अपेक्षा आहे. तुम्ही विश्वास ठेवा”, असं आवाहन पंकजा यांनी कार्यकर्त्यांना केलं.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.