AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नामदेवशास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले गालावरून वारं…

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे, धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करा असं त्यांनी म्हटलं आहे, त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नामदेवशास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले गालावरून वारं...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 17, 2025 | 7:45 PM
Share

भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करा, पहिल्या पदावर येऊन धनंजय मुंडे यांच्या हातून समाजाची सेवा घडावी असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे. त्यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? 

महंत नामदेव शास्त्री काय बोलले याच्यावर मी बोलणार नाही, शेवटी गादीचा सन्मान आम्ही करतो. ते काहीही बोलले तरी आम्ही बोलणार नाही. परंतु ते पुन्हा पदावर येणे म्हणजे अन्याय अत्याचार त्या जिल्ह्यातल्या लोकांवर सुरू होणे, त्याचे दुष्परिणाम पुन्हा एकदा सरकारला भोगावे लागतील. कारण आत्ताच मंत्रिपदाचा गैरवापर करून किती गुंडगिरी वाढली होती, ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे होते तेव्हा इतकी गुंडगिरी नव्हती. त्यामुळे ते पुन्हा पदावर आले तर आम्ही वस्ताद आहेतच, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, त्या गादीचा आम्ही सन्मान करतो, त्यामुळे आम्ही काही बोलणार नाही. परंतु त्यांच्या अंगावरून वारं गेलं की गालावरून वारं गेलं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. त्यावर मी बोलणार पण नाही. धनंजय मुंडे पुन्हा पदावर आले तर पुन्हा गुंडगिरी वाढणार, टोळ्या वाढणार आणि पुन्हा लोक मारणार. आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्यावर अन्याय अत्याचार होणार.

ज्या ज्या वेळेस मंत्रिपदाचा दुरुपयोग करून गुंडागिरी सुरू झाली, खंडण्या सुरू झाल्या. आणि लोकांच्या हत्या झाल्या, त्यावेळी जिल्ह्यातल्या सर्व समाजातील लोकांचे मन दुखले. त्यांचा विषय मी बोलणं बंद करून टाकलेला आहे, त्याचं कारण म्हणजे आमचेच धड नाहीत, सरकार आणि फडणवीस यांची काही प्रतिनिधी अंधारात काही गोष्टी ठरवत आहेत. त्याचीही संपूर्ण माहिती आम्हाला मिळाली आहे. जर देशमुख कुटुंबावर काही अडचण आली आणि आरोपी सुटले त्यावेळी आम्ही यांना आमचा कचका दाखवून, असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....