Pankaja Munde PA Wife: गौरी गर्जेच्या नातेवाईकांची मोठी मागणी, इन-कॅमेरा पोस्टमार्टम होणार?
Pankaja Munde PA Anant Garje Wife: पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तर गौरीच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत मोठी मागणी केली आहे.

In-Camera Post-mortem: पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक(PA) अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे-पालवे हिने आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्यावरून एकच खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी गौरीच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा आरोप केला आहे. तर याप्रकरणी आता गौरीच्या मामांनी याप्रकरणात इन कॅमेरा पोस्टमार्टेम (in-cemera postmortem) करण्याची मागणी केली आहे. ही योजनाबद्ध हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर ताज्या अपडेटनुसार, आता अनंत गर्जेचे बहीण शीतल आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरळी परिसरात घडली घटना
मुंबईतील वरळी परिसरात भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जे हा पत्नीसह राहत होता. गौरी पालवे हिने गुरुवारी सायंकाळी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. गौरी या केईएम रुग्णालाय दंतवैद्यक विभागात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. अनंत गर्जेसोबत त्यांच्या विवाहाला दहा महिनेच झाले आहेत. गौरी पालवे यांचा मृतदेह केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ही घटना नेमकी कशी घडली याचा पोलीस तपास करत आहेत.
इन-कॅमेरा पोस्टमार्टेम करण्याची मागणी
याप्रकरणात गौरी पालवे यांच्या दुसऱ्या मामांनी आणखी मोठा दावा केला आहे. ही आत्महत्या नसून तर योजनाबद्ध हत्या असल्याचा आरोप मामांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. गौरी ही संघर्ष करणारी मुलगी होती. ती सतत प्रयत्न करणारी होती. तिने अनेक आव्हानांना तोंड दिले आहे. त्यामुळे ती असे काही पाऊल टाकेल असे वाटत नसल्याचे ते म्हणाले. तर याप्रकरणी इन-कॅमेरा पोस्टमार्टेम करण्याची मोठी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे कोणताही तपशील लपणार नाही असे मत त्यांनी मांडले.
अनंत गर्जेचे वक्तव्य काय?
अनंत गर्जे याने घटना घडली तेव्हा आपण घरी नव्हतो. दुसऱ्या बाजूने घरात शिरून आपण गौरीला खाली उतरवले आणि रुग्णालयात दाखल केल्याचा दावा केला आहे. तर गौरीच्या नातेवाईकांनी अनंत याने आपल्या देखत गौरीने फाशी घेतल्याचा दावा केला आहे. त्यामुळे याप्रकरणातील गुढ वाढले आहे. याप्रकरणी आता दोघांचे मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्डिंग, चॅटिंग आणि नातेवाईकांचे जबाब महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानंतर या प्रकरणातील सत्य समोर येईल.
