AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर धनंजय मुंडे यांनी मौन सोडलं, फडणवीसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सभागृहात बोलताच मुंडे म्हणाले….

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड हे मुख्य आरोपी आहेत. त्यामुळे विरोधकांकडून या प्रकरणावरुन वाल्मिक कराड याच्या आडून थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला जातोय. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात या प्रकरणावर कारवाईची खात्री दिल्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली.

अखेर धनंजय मुंडे यांनी मौन सोडलं, फडणवीसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सभागृहात बोलताच मुंडे म्हणाले....
धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस
| Updated on: Dec 20, 2024 | 8:20 PM
Share

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात बीडच्या केज येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भूमिका मांडली. त्यांनी या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचं नाव घेतलं. “आपण वारंवार वाल्मीक कराडच नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो या गुन्ह्यामध्ये तर त्याचा पुरावा दिसतोच आहे. त्याच्यावर कारवाई होणारच आहे. पण देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मीक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुणाकुणासोबत फोटो आहेत, सगळ्यांसोबत होते, आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत पवार साहेबांकडे सोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल”, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दिली. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई होईल, अशी महत्त्वाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करुन चौकशी केली जात असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं. यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे हे माध्यमांसमोर आले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड हे मुख्य आरोपी आहेत. त्यामुळे विरोधकांकडून या प्रकरणावरुन वाल्मिक कराड याच्या आडून थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला जातोय. विशेष म्हणजे या प्रकरणावर अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या सभागृहात सातत्याने विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भूमिका मांडली. पण यावेळी धनंजय मुंडे सभागृहात नव्हते. त्यावरुनही प्रश्न उपस्थित केले जात आहे. अखेर याबाबतच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांनी मौन सोडलं आहे.

आपण सभागृहात का उपस्थित नव्हता?

संतोष देशमुख प्रकरणावर चर्चा सुरु असताना आपण का सभागृहात उपस्थित नव्हता? असा प्रश्न धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारला अता, “त्या चर्चेचं उत्तर मुख्यमंत्री देणार असतील, तर या प्रथा परंपरेप्रमाणे मी सदनात उपस्थित राहिलो नाही. एक लक्षात घ्या की, विरोधकांनी काहीतरी बोललं आणि माझ्याकडे काहीतरी जाणार, यावर नक्कीच मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण होणार. त्यामुळे एकदा काय दूध का दूध आणि पाणी का पाणी कळावं. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरावर समजलं आहे”, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली.

“एक लक्षात घ्या, मी सुरुवातीपासून म्हणतोय, हे व्यवहारातून झालेलं भांडण आहे, ज्यातून संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण हत्या झाली आहे. ज्याप्रकारे हत्या झाली आहे त्याचं समर्थन होऊ शकत नाही. या प्रकरणात आता जवळपास सर्वच आरोपींना अटक झाली आहे”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

मुंडेंकडून ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजवर भाष्य

“या प्रकरणात आमची सर्वांची तीव्र भावना होती. या प्रकरणी आता एसआयची स्थापन झाली आहे. सीआयडी नेमली आहे. या प्रकणात आता फार शेवटपर्यंत ह्याचा तपास होणार आहे. कोण होतं काय होतं, आदल्यादिवशी जो गुन्हेगार आहे तो, संतोष देशमुख यांचा भाऊ आणि पोलीस अधिकारी यांचा हॉटेलमधील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय. तो व्हिडीओ सर्व चॅनलवर बघितला आहे. आता या प्रकरणात सर्व तपास आहे, तो तपास तपास यंत्रणांनी काढणं जरुरीचं आहे”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

मोक्कावर मुंडे काय म्हणाले?

“या प्रकरणात मोक्का लावण्याबाबत मुख्यमंत्री जे काही बोलले, याच प्रकरणात मोक्का लावायचा की, आणखी असे काही प्रकल्प बीड जिल्ह्यात आहेत, ज्या खऱ्या लोकांना मोक्को त्याही ठिकाणी लावला पाहिजे, या भूमिकेचा मी आहे. पण आता मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन दिलं आहे त्यावर स्वभाविकपणे सर्वांचं समाधान झालेलं आहे”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

“आरोपी सोबत माझं नाव जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. या सदनात अनेकदा असे प्रकार घडले आहेत. शेवटी तपास होणार आहे. ही केसही सीआयडीकडे दिलेली आहे. या प्रकरणात आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. विरोधीपक्ष नेत्याने काय बोलावं हे मला सांगता येत नाही”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.