AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात अंत्ययात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार, नातेवाईक प्रचंड घाबरले, मृतदेह रस्त्यातच सोडून पळत सुटले

जळगावच्या पारोळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंत्ययात्रेवेळी नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली, मृतदेहाला रस्त्यात सोडून नातेवाईक पळत सुटले.

जळगावात अंत्ययात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार, नातेवाईक प्रचंड घाबरले, मृतदेह रस्त्यातच सोडून पळत सुटले
Follow us
| Updated on: Feb 17, 2025 | 4:24 PM

जळगावच्या पारोळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंत्ययात्रेवेळी नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली, मृतदेहाला रस्त्यात सोडून नातेवाईक  पळत सुटले. ही घटना पारोळा तालुक्यातल्या नगाव गावामध्ये घडली आहे. जळगावच्या पारोळा तालुक्यातल्या नगाव गावात स्मशान भूमीकडे जात असलेल्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. अंत्ययात्रा सुरू असताना मधमाशांनी अचानक हल्ला केला. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली.  या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगावच्या पारोळा तालुक्यातल्या नगाव गावात  ही घटना घटना घडली आहे. स्मशान भूमीकडे जात असलेल्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. अचानक हल्ला झाल्यामुळे नातेवाईकांची एकच धावपळ उडाली. मृतदेह रस्त्यातच सोडून नातेवाईक वाट सापडेल तिकडे पळत सुटले.  या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मधमाशांनी हल्ला केल्यानंतर स्वतः चा बचाव करण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी शोकाकुल नातेवाईक मृतदेह सोडून वाट मिळेल तिकडे पळाले. नगाव गावातील स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा जात असताना रस्त्यात अचानक मधमाशांचं पोळं उठल्याने ही घटना घडली. मधमाशांचं पोळ उठलं आणि या मधमाशांनी थेट अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर हल्ला केला. अचानक मधमाशांचा हल्ला झाल्यानं नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. घटनास्थळी धावपळ उडाली. मृतदेह रस्त्यातच सोडून नातेवाईक घटनास्थळावरून वाट दिसेल तिकडे पळत सुटले.

 तीन जण गंभीर जखमी 

दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर काही जण हे किरकोळ जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या तीन जणांना उपचारासाठी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  साधु भागा भिल वय 75, ओंकार शंकर भिल वय 65, मधुकर सजन भिल वय 55, तिघे राहणार नगाव ता. पारोळा अशी या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.