AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : …तर फडणवीस, विखे तुमच्या नरड्यावर येईन, दिवाळीआधी सगळ्या…मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला मोठा इशारा

Manoj Jarange Patil : "आमची पण मागणी आहे, 1994 चा जीआर रद्द करा. वरच 2 टक्के आरक्षण ते पण रद्द करा. काहींनी असं सांगितलं की, आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो. म्हणून बंजारा समाजाच आरक्षण घेतलं, ते बंजारा समाजासारखे दिसत नाहीत. त्यांना बाहेर काढा"

Manoj Jarange Patil :  ...तर फडणवीस, विखे तुमच्या नरड्यावर येईन, दिवाळीआधी सगळ्या...मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला मोठा इशारा
Manoj Jarange Patil
| Updated on: Oct 04, 2025 | 12:00 PM
Share

मराठ्यांच्या आरक्षणाला कुठही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही. आमचं आरक्षण हक्काच आहे. बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये, एवढी आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे. मराठ्यांच आणि मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ होईल असं एकही पाऊल आपण जातीयवादी नेत्यांचं ऐकून उचलू नये असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. वडेट्टीवार म्हणतायत, मराठा आरक्षणासाठी जो जीआर केलाय तो रद्द करण्याची आमची मागणी आहे. त्याचं कोण ऐकतय बुगळ्याच त्या. त्या लाल्याने सांगितलं असेल, दिल्लीत गांधी एक लाल्याने सांगितल असेल, मराठ्यांच्या विरोधात बोल म्हणून. कारण काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलतेय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

ओबीसींचा नेता कोणी नाही. जास्त बोलतात म्हणून मुख्यमंत्र्यांनी बोलवून घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांना यांची औकात कळली आहे. हे ओबीसींचे नेते होऊ शकत नाही, हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलय. त्यामुळे बापाची पेंड आहे का? जीआर रद्द करणं. हैदराबाद गॅझेटच्या आधारे जीआर काढलाय. आमची पण मागणी आहे, 1994 चा जीआर रद्द करा. वरच 2 टक्के आरक्षण ते पण रद्द करा. काहींनी असं सांगितलं की, आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो. म्हणून बंजारा समाजाच आरक्षण घेतलं, ते बंजारा समाजासारखे दिसत नाहीत. त्यांना बाहेर काढा. यापुढे जशाला तशी फाईट होणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

पळायलाही जागा उरणार नाही

ओबीसीत 400-500 जाती आहेत. छगन भुजबळ थोड्या माळ्यांचा नेता आहे, सगळ्या माळ्यांचा नाही. हे जातीचे नेते आहेत, यात ओबीसींचा संबंध नाही. काही गरज नाही याच्या मागेमागे पळायची. मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगणं आहे की, मराठ्यांच्या आरक्षणाच्या जीआरचा अवमान होईल, अस् त्यांचं ऐकून पाऊल उचलायच नाही. ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. त्याचं ऐकून आमची प्रमाणपत्र थांबवू नका. दिवाळीच्याआधी हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा. अन्यथा पुन्हा सरकारसाठी आंदोलनाचा वाईट दिवस येईल . तुम्ही मजा बघत असाल, आज करु, उद्या करु. तर फडणवीस आणि विखे तुमच्या नरड्यावर येईन, पळायलाही जागा उरणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.