दुसऱ्यांदाही मुलगीच झाली, नाराज मातेने नकोशीसोबत केले ‘हे’ कृत्य

दुसरीही मुलगीच झाल्याने नाराज झालेल्या मातेने दोन दिवसांच्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी क्रूर मातेला ताब्यात घेतले आहे.

दुसऱ्यांदाही मुलगीच झाली, नाराज मातेने नकोशीसोबत केले 'हे' कृत्य
दुसरीही मुलगी झाल्याने मातेने उचलले टोकाचे पाऊलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 7:35 PM

लातूर : माणुसकीला काळिमा फासणारी घटना लातूर जिल्ह्यातील काटगाव-तांडा येथे घडली आहे. दुसरीही मुलगीच झाल्याने नाराज झालेल्या मातेने दोन दिवसांच्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी क्रूर मातेला ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. रेखा चव्हाण असे आरोपी मातेचे नाव आहे. पोलिसांनी तिला अटक करत न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

प्रसुतीसाठी लातूरमध्ये माहेरी आली होती महिला

लातूर जिल्ह्यातील काटगाव तांडा येथील रेखा हिचा उस्मानाबाद जिल्ह्यातील होळी येथील किसन चव्हाण याच्याशी विवाह झाला होता. रेखाला पहिली मुलगी आहे. दुसऱ्यांदा गरोदर राहिलेली रेखा प्रसुतीसाठी माहेरी काटगाव तांडा येथे आली होती.

दुसऱ्यांदाही मुलगी झाल्याने नाराज होती महिला

रेखाला 27 डिसेंबर रोजी जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. रेखाला दुसऱ्यांदाही मुलगी झाली. यामुळे रेखा नाराज होती. यातूनच तिने नकोशीला संपवले.

तपासादरम्यान आईनेच मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले

बाळाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. तपासाअंती दुसरी मुलगी झाल्याने आईनेच मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी या क्रूर मातेला अटक केली आहे.

गातेगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिलेला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. महिलेचा पती पुण्यात मोलमजुरीचे काम करतो.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.