AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी बाळाला विकलं, नंतर सपासप पोटावर वार, डॉक्टरचं हादरवून टाकणारं कृत्य; स्वत:वरच…

भंडाऱ्यातील १० दिवसांच्या बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश वाजपेयी याने अटकेच्या भीतीने स्वतःवर ब्लेडने हल्ला करत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणात आता आरोपींची संख्या ६ झाली असून पोलिसांनी तपास तीव्र केला आहे.

आधी बाळाला विकलं, नंतर सपासप पोटावर वार, डॉक्टरचं हादरवून टाकणारं कृत्य; स्वत:वरच...
bhandra
| Updated on: Feb 15, 2026 | 3:20 PM
Share

भंडारा जिल्ह्यातील खळबळजनक १० दिवसांच्या बाळ विक्री प्रकरणात आता एक धक्कादायक ट्वीस्ट आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. नितेश वाजपेयी याने पोलिसांच्या अटकेच्या भीतीने स्वतःवर ब्लेडने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या या डॉक्टरवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी या टोळीतील आणखी एका आरोपीची ओळख पटवली आहे.

नाट्यमय थरार आणि आत्महत्येचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी भंडारा जिल्हा बाल विकास विभागाच्या तक्रारीवरून वरठी पोलीस ठाण्यात बाळ विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून मुख्य आरोपी डॉ. नितेश वाजपेयी आणि त्याचे तीन साथीदार पोलिसांना गुंगारा देत होते. पोलीस त्यांच्या मागावर असताना आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास डॉक्टरने बालाघाट-कटनी मार्गे स्वतःच्या खाजगी कारने भंडाऱ्याकडे येण्याचा बेत आखला.

गोबरवाही परिसरातील रस्त्यावर पोहोचल्यावर डॉक्टरने लघुशंकेचे कारण सांगून चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. गाडीतून खाली उतरताच त्याने खिशातून ब्लेड काढून स्वतःच्या पोटावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉक्टरला पाहून चालकाची घाबरगुंडी उडाली. त्याने तातडीने डॉक्टरला तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडाऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तो पोलीस निगराणीखाली उपचार घेत आहे.

आरोपींची संख्या वाढली

या गुन्ह्याचा तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येताना दिसत आहेत. पोलिसांनी या रॅकेटमध्ये आता सहाव्या आरोपीचे नाव निष्पन्न केले आहे. यावेळी पोलिसांनी लल्लेश्वरी सादेपाच आणि सागर सिक्का (रा. गोंदिया) या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर मालती प्रकाश वाघमारे, पौर्णिमा सतीश धुर्वे आणि उमेशसिंग रामचंद्र सिंग गहलोत (रा. गोंदिया) यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

दरम्यान केवळ दहा दिवसांच्या निष्पाप बाळाचा सौदा करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट आहे. एका सुशिक्षित डॉक्टरने अशा प्रकारे गुन्हेगारी पाऊल उचलल्याने वैद्यकीय क्षेत्रातही चर्चा सुरू आहे. या टोळीने आतापर्यंत नेमकी किती बालकांची विक्री केली आहे? या रॅकेटचे जाळे आंतरराज्यीय स्तरावर पसरले आहे का? आणि यात आणखी कोणते मोठे मासे अडकणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात