AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara Tiger | भंडाऱ्यात मोहफुल वेचायला गेलेल्या व्यक्तीवर वाघाचा हल्ला, 40 वर्षीय व्यक्तीचा पाडला फडशा

वाघाच्या हल्ल्यात चाळीस वर्षीय व्यक्ती ठार झाला. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात काल ही घटना घडली. मोहफुल वेचायला गेलेला व्यक्ती घरी परतला नाही. त्याला शोधायला गेले असता जंगलात त्याचा मृतदेहच सापडला.

Bhandara Tiger | भंडाऱ्यात मोहफुल वेचायला गेलेल्या व्यक्तीवर वाघाचा हल्ला, 40 वर्षीय व्यक्तीचा पाडला फडशा
वाघाने हल्ला केल्यानंतर जयपालची सायकल आणि मोहफुलं असे पडून होते.
| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 12:04 PM
Share

भंडारा : गावाजवळील जंगलात मोहफुल (Mohful) वेचण्यासाठी गेलेल्या एका चाळीस वर्षीय इसमावर वाघाने हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथे घडली. जयपाल घोगलू कुंभरे (Jaipal Kumbhare) असे मृतकाचे नाव आहे. जयपाल हा दररोज नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास इंदोरा येथील वन विभागाच्या (Forest Department) नर्सरीजवळील जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेला होता. जयपाल काही मोहफुल वेचल्यानंतर सायकलने गावाकडे परत येत होता. दरम्यान, पुन्हा झाडाखाली मोहफुल पडले दिसल्याने तो रस्त्याजवळील मोहफुल वेचत होता. त्यावेळी वाघाने हल्ला केला. घटनास्थळावरून जवळपास अर्धा किमी अंतरावर वाघाने जयपालला ओढत नेले. त्याचा उजवा पाय संपूर्ण खाल्ला. जयपाल कुंभरेच्या मृत्यूनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दोनशे मीटर फरफटत नेले

दबा धरून बसलेल्या वाघाने जयपालवर हल्ला केला. त्यानंतर जयपालने त्याच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न केला. पण, जयपालची सुटका होऊ शकली नाही. त्याला वाघाने सुमारे दोनशे मीटर फरफटत नेले. रक्त पिऊन एक पाय निकामी केला. अर्धवट मृतदेह सापडला.

जंगलात शोधाशोध

घरून मोहफुल वेचणीसाठी गेलेला जयपाल दुपार झाली तरी परतला नाही. त्यामुळं त्याच्या शोधासाठी गावकरी जंगलात गेले. ज्या भागात तो मोहफुल वेचतो हे माहीत होते. तो भाग पिंजून काढला. शेवटी जयपालचा मृतदेह सापडला. हा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता.

मोहफुल वेचणी जोरात

वाघाच्या हल्ल्यात चाळीस वर्षीय व्यक्ती ठार झाला. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात काल ही घटना घडली. मोहफुल वेचायला गेलेला व्यक्ती घरी परतला नाही. त्याला शोधायला गेले असता जंगलात त्याचा मृतदेहच सापडला. सध्या मोहफुलांची वेचणी सुरू आहे. मोहाच्या झाडाखाली पडलेली फुलं वेचली जातात. ही फुलं जनावरांना खाद्य म्हणून दिली जातात. शिवाय मोहफुलापासून दारू बनविली जाते. यातून रोजगार निर्मिती होते. जयपाल हा जंगलात मोहफुल वेचायला गेला असताना ही घटना घडली.

Nagpur IPS woman officer : धक्कादायक ! नागपुरात आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या घरात घुसून मारहाण, चोरीही, पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे

Congress: काँग्रेसच्या असंतुष्टांची नाना पटोलेंवरच भडास?; डिनर डिप्लोमसीत ‘खाना’खराबा?

Nagpur Suicide | मृत्यूनंतरच्या जगाचं आकर्षण, नागपुरात 13 वर्षांच्या बलिकेची आत्महत्या

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.