Bhandara news : पाच मित्र जलाशयावर पोहायला गेले होते, बघता बघता एक जण दिसेनासा झाला !

सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पाच मित्र जलाशयावर पोहण्यासाठी गेले होते. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. पोहता पोहता एक दिसेनासा झाला.

Bhandara news : पाच मित्र जलाशयावर पोहायला गेले होते, बघता बघता एक जण दिसेनासा झाला !
Image Credit source: socialmedia
| Edited By: | Updated on: Aug 17, 2023 | 9:43 AM

भंडारा / 17 ऑगस्ट 2023 : जलाशयावर पोहायला गेलेल्या पाच मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे. तर अन्य चौघे सुदैवाने बचावले आहेत. शैलेश घरडे असे मयत तरुणाचे नाव आहे. तर कपिल मल्ल्यानी, रामकृष्ण लंजे, रामप्रसाद तिवारी, लक्ष्मण सयाम अशी बचावलेल्या चौघांची नावं आहेत. भंडाऱ्याच्या साकोली इथल्या शिवनीबांध जलाशयावर ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

पोहता पोहता दिसेनासा झाला

पाच मित्र भंडाऱ्यातील साकोली येथे शिवनीबंध जलाशयावर पोहायला गेले होते. पाचही जण पाण्यात पोहायला उतरले. पोहता पोहता शैलेश दिसेनासा झाला. चौघांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा कुठेच शोध न लागला नाही. मग मित्रांनी साकोली पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने शैलेशचा शोध सुरु केला. अखेर दोन पोहणाऱ्यांच्या मदतीनं शैलेशचा मृतदेह शोधण्यास पोलिसांना यश आले. मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.