AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara Murder | धक्कादायक! वडिलांनी दिला वेगळा राहण्याचा सल्ला, कुऱ्हाडीचे घाव घालत वृद्ध वडिलांचा मुलानेच घेतला जीव

वेगळे राहायचा सल्ला देणाऱ्या वृद्ध वडिलांच्या मानेवर मुलाने कुन्हाडीचा घाव घालले. यात वडील जागीच ठार झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सोनमाळ येथे घडली. याप्रकरणी आरोपी मुलाला साकोली पोलिसांनी जेरबंद केले आहे.

Bhandara Murder | धक्कादायक! वडिलांनी दिला वेगळा राहण्याचा सल्ला, कुऱ्हाडीचे घाव घालत वृद्ध वडिलांचा मुलानेच घेतला जीव
कुऱ्हाडीचे घाव घालत वृद्ध पित्याला केले ठार Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: May 29, 2022 | 9:30 AM
Share

भंडारा : ही थरारक घटना आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सोनमाळ (Sonmal in Sakoli taluka) येथील. जानबा मेश्राम (Janba Meshram) आणि मुलगा देवेंद्र एकाच कुटुंबात राहत असतं. काल रात्री जेवण झाल्यानंतर जानबाने आपला नातू अनिकेत याला तुझी आई सडा सारवण व्यवस्थित करीत नाही. त्यामुळे तू आपल्या वडिलांना सांगून वेगळे राहा असे सांगत होता. त्याचवेळी दुसऱ्या खोलीत असलेल्या देवेंद्रने वडिलांचे बोलणे ऐकले. रागाच्या भरात तो घरातून कुऱ्हाड आणत कोणताही विचार न करता थेट जन्मदात्या वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला. घाव जानबा यांच्या वर्मी बसला. वडील जानबा रक्त बंबाळ होत खाली पडून मृत्यूमुखी पडले. आरडाओरड होताच पाहुणी आलेल्या बहीण श्यामकला सहारे (Shyamkala Sahare) धावत आली. तिलाही मारहाण करण्यात आली.

आरोपी मुलाला अटक

वेगळे राहायचा सल्ला देणाऱ्या वृद्ध वडिलांच्या मानेवर मुलाने कुन्हाडीचा घाव घालले. यात वडील जागीच ठार झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सोनमाळ येथे घडली. याप्रकरणी आरोपी मुलाला साकोली पोलिसांनी जेरबंद केले आहे. जानबा गोगलू मेश्राम (वय 70) असे मृत वडिलांचे नाव आहे. देवेंद्र जानबा मेश्राम (33) असे आरोपी मुलाचे नाव आहे. या घटनेची माहिती होताच गावकरी घटनास्थळी धाव घेतली. साकोली पोलिसांना सूचना देण्यात आली. आरोपी देवेंद्र मेश्राम याला अटक करण्यात आली. त्यांच्या विरुद्ध 302, 323 कलमान्वये गुन्हा दाखल केला. मृतदेहाची उत्तरीय तपासणीसाठी साकोली रुग्णालयात पाठविण्यात आला. क्षुल्लक राग किती महागात पडतो, याची प्रचिती सोनमाळा येथे पहायला मिळाली.

अशी घडली घटना

आजोबा आपल्या नातवाशी बोलत होते. तुझी आई व्यवस्थित सडासारवण करत नाही. त्यामुळं तू तुझ्या वडिलांना सांगून वेगळं राहा. हा संवाद मुलगा देवेंद्र यानं एकला. त्याचा तिडपापड झाला. माझ्या बायकोला कामं येत नाही, असं माझे वडील का म्हणाले. याचा प्रचंड राग आला. रागाच्या भरात त्याने घरातील कुऱ्हाड काढली. ती सरळ वडिलांच्या मानेवर जोरात मारली. यात जानबा यांचा जागीच मृत्यू झाला. रागाच्या भरात आपण कुणाच्या मानेवर कुऱ्हाड चालवितो, याचे भानरही देवेंद्रला राहिले नाही. आता खडी फोडण्याशिवाय त्याला पर्याय नाही.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.