Bhandara Agriculture | बी-बियाणं, खतांच्या किमतीत वाढ, डीएपी खताची किंमत 350 रुपयांनी वाढली

Bhandara Agriculture | बी-बियाणं, खतांच्या किमतीत वाढ, डीएपी खताची किंमत 350 रुपयांनी वाढली
बी-बियाणं, खतांच्या किमतीत वाढ

सर्वाधिक मागणी असलेल्या डीएपी खताची किंमत 350 रुपयांनी वाढली आहे. एमओपीचे दर 730 रुपये, अमोनियम सल्फेट 300 रुपये. 15:15:15 चे दर दोनशे रुपये, 20:20:00 चे दर 290 रुपयांनी वाढले आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे व एसएसपीच्या दरात 43 रुपयांनी वाढ झाली आहे.

तेजस मोहतुरे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jun 22, 2022 | 3:57 PM

भंडारा : जिल्ह्यात बी-बियाणे, खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. शेती पिकविणे महाग झाले आहे. यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी तुलनेने महाग ठरणारा आहे. बियाणे व खतांच्या किमतीतील दरवाढीसोबतच मशागत, पेरणी व नंतरची कामे याचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. धानासह सोयाबीनच्या (Soybeans) दरात यंदा चांगलीच वाढ झाली. युरिया वगळता उर्वरित सर्वच खतांच्या किमती तडकल्या आहेत. यंदा बियाणे (seeds) व खतांच्या किमतीतील दरवाढ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. धानाच्या दरात गतवर्षीपेक्षा प्रतिबॅग 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी युरियाची (urea) 45 किलोची गोणी 266 रुपयांची होती. यंदाही त्याच भावात उपलब्ध आहे.

डीएपी खताच्या किमतीत मोठी वाढ

शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पाऊस पडल्यानं बळीराजा शेतीच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. बियाणे पेरण्यासाठी खरेदीसाठी जात आहे. अशावेळी बियाण्यांच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. यामुळं शेतकऱ्यांचा खर्चाचा बजेट वाढला आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या डीएपी खताची किंमत 350 रुपयांनी वाढली आहे. एमओपीचे दर 730 रुपये, अमोनियम सल्फेट 300 रुपये. 15:15:15 चे दर दोनशे रुपये, 20:20:00 चे दर 290 रुपयांनी वाढले आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे व एसएसपीच्या दरात 43 रुपयांनी वाढ झाली आहे. बियाणांचा खर्च वाढला. खतांच्या किमतीत वाढ आली. दुसरीकडं डिझेडच्या किमती मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढल्या आहेत. त्यामुळं ट्रक्टरचाही खर्च वाढला आहे. शिवाय मजुरी दरवर्षी थोड्याफार प्रमाणात वाढतच असते.

वाढीव खर्च करणार कसा?

खतापैकी भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक मागणी डीएपी खताची आहे. पण, याच खताच्या किमतीत वाढ झाली आहे. तब्बल 350 रुपयांनी डीएपी खतावर वाढले असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आता धानासाठी जमीन नांगरणी सुरू झाली. शेतीची मशागत केली जात आहे. धानाचे परे (नर्सरी) पेरल्यानंतर ते वाढीस लागावे यासाठी खताची गरज पडते. शिवाय रोवणी झाल्यानंतर त्यावर खत मारावे लागते. त्यानंतर ते जोमाने वाढते. पण, खताच्या किमतीत वाढ झाल्यानं आता वाढीव खर्च कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें