Nitin Deshmukh : नितीन भौ तब्येत कशीय? एकनाथ शिंदेंच्या गटातून सुटलेले नितीन देशमुख म्हणाले मी टकाटक हाव

नितीन देशमुख म्हणाले, मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आता मी घरी जात आहे. मी मंत्र्यांसोबत गुजरातला गेलो होतो. काल रात्री हॉटेलमधून 12 वाजता निघालो. रस्त्यावर तीन वाजता उभा होता. मला बाहेर जायचं होतं. पण, 100-200 पोलीस माझ्या मागावर होते. मला कोणत्याही वाहनात बसू दिलं नाही. त्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आलं.

Nitin Deshmukh : नितीन भौ तब्येत कशीय? एकनाथ शिंदेंच्या गटातून सुटलेले नितीन देशमुख म्हणाले मी टकाटक हाव
नितीन देशमुख म्हणाले मी टकाटक हाव
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 2:28 PM

नागपूर : शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख हे काल गुजरातमध्ये (Gujarat) होते. ते शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत होते. नितीन देशमुख यांच्या पत्नीनं अकोला पोलीस (Akola Police) ठाण्यात माझे पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. नितीन देशमुख हे आज नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) परत आले. त्यानंतर मी अकोला जिल्ह्यात माझ्या घरी जात असल्याचं सांगितलं. यावेळी नितीन देशमुख म्हणाले, या महाराष्ट्रातला शिवछत्रपतींच्या राज्यातला मी मावळा आहे. गुजरातचे पोलीस मला काही करू शकत नाही. माझी तब्ब्येत टकाटक आहे. तुमच्यासोबत चांगल्या पद्धतीनं मी उभा आहे. काल मला त्याठिकाणी पोलिसांनी जबरदस्तीमध्ये हॉस्पिटलला नेलं. त्यांनी मला अटॅक आला म्हणून तुमची तपासणी करायची आहे, असं सांगितलं. मला कोणत्याही प्रकारचा अटॅक आला नव्हता. माझी बीपीसुद्धा वाढली नव्हती, अशी स्पष्टोक्ती नितीन देशमुख यांनी दिली.

पाहा व्हिडीओ काय म्हणाले, नितीन देशमुख

चुकीच्या पद्धतीनं इंजेक्शन टोचलं

नितीन देशमुख नागपूर विमानतळावर बोलत होते. ते म्हणाले, मला अटॅक आला, असं सांगण्यामागचा त्यांचा हेतू चुकीचा होता. मला 20-25 रुग्णालयात नेल्यानंतर 20-25 जणांना मला पकडून ठेवलं. माझ्या दंडामध्ये इंजेक्शन टोचलं. ते इंजेक्शन कोणते होते काय होते मला माहिती नव्हतं. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीनं प्रक्रिया करण्याचं षडयंत्र करण्याचं त्या लोकांनी ठरविलं असावं.

हे सुद्धा वाचा

मी ठाकरेंचा शिवसैनिक

नितीन देशमुख म्हणाले, मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आता मी घरी जात आहे. मी मंत्र्यांसोबत गुजरातला गेलो होतो. काल रात्री हॉटेलमधून 12 वाजता निघालो. रस्त्यावर तीन वाजता उभा होता. मला बाहेर जायचं होतं. पण, 100-200 पोलीस माझ्या मागावर होते. मला कोणत्याही वाहनात बसू दिलं नाही. त्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आलं. काल एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले नितीन देशमुख हे आता ठाकरे गटात परत आलेत. एकनाथ शिंदे समर्थक आमदार हे गुवाहाटीला गेले. पण, नितीन देशमुख यांना उद्धव ठाकरे यांच्या गटात राहायचं आहे. त्यामुळं ते सुरतवरून सरळ नागपूर विमानतळावर आले. त्यानंतर ते अकोला जिल्ह्यात जात आहेत. ज्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना त्यांच्या सोबत राहायचं होतं ते गुवाहाटी येथे गेले आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.