Maharashtra Politics: सुरतमध्ये एकनाथ शिंदेंना संजय कुटे भेटले, शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांपूर्वी पोहचणारे कुटे कोण?

बुलडाणा : विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे काही समर्थक आमदारांना घेऊन गुजरातमध्ये (Gujarat) गेले. सुरतमधील ली मेरिडीयन हॉटेलमध्ये ते पोहचले. या बंडामागे भाजपचा हात असल्याचं वृत्त भाजपचे नेते फेटाळत राहिले. या राजकीय घडामोडींना वेग आला. तेव्हा एकनाथ शिंदे यांची मनधरणी शिवसेनेकडून सुरू झाली. मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे एकनाथ शिंदे यांना भेटायला सुरतला गेले. […]

Maharashtra Politics: सुरतमध्ये एकनाथ शिंदेंना संजय कुटे भेटले, शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांपूर्वी पोहचणारे कुटे कोण?
सुरतमध्ये एकनाथ शिंदेंना संजय कुटे भेटले
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 3:55 PM

बुलडाणा : विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे काही समर्थक आमदारांना घेऊन गुजरातमध्ये (Gujarat) गेले. सुरतमधील ली मेरिडीयन हॉटेलमध्ये ते पोहचले. या बंडामागे भाजपचा हात असल्याचं वृत्त भाजपचे नेते फेटाळत राहिले. या राजकीय घडामोडींना वेग आला. तेव्हा एकनाथ शिंदे यांची मनधरणी शिवसेनेकडून सुरू झाली. मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे एकनाथ शिंदे यांना भेटायला सुरतला गेले. पण, तत्पूर्वी तिथं पोहचले ते भाजपचे माजी मंत्री डॉ. संजय कुटे. (Sanjay Kute) कुटे ली मेरिडीयन हॉटेलमध्ये होते. त्यामुळं या वृत्ताला बळ मिळालं. शिवाय एकनाथ शिंदे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटल्याचं मान्य केलं.

बुलडाण्यातील भाजपचे नेते

संजय कुटे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. आक्रमक शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत. भाऊसाहेब फुंडकर यांनी कुटे यांना राजकारणात आणलं. फुंडकर यांच्या निधनानंतर बुलडाणा जिल्ह्यात संजय कुटे हे वरिष्ठ नेते बनले. ते कुणबी समाजातील असल्यानं भाजपचा ओबीसी चेहरा आहेत. त्यांनी बुलडाणा भाजपचं जिल्हाध्यक्ष, राज्य भाजप सरचिटणीस अशी पदं भूषविली आहेत.

कोण आहेत संजय कुटे

अमरावती जिल्ह्यातही कुटे यांच्या शब्दाला वजन आहे. निवडणुकीचा काळ वगळता सर्व पक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशीही त्यांची प्रतिमा आहे. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी संजय कुटे यांनी पोलिंग एजंट म्हणून काम पाहिलं. जळगाव जामोदमधील द न्यू ईरा हायस्कूलमधून ते 1985 मध्ये दहावी उत्तीर्ण झाले. 1988 साली बारावी झाले. मोझरी येथील श्री गुरुकुंज आयुर्वेदिक महाविद्यालयातून 1994 साली बीएएमएसचं शिक्षण पूर्ण केलं. 2004 साली ते थेट आमदार म्हणून निवडून आले. फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट फडणवीस सरकारच्या शेवटच्या मंत्रीमंडळात संजय कुटे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं. बुलडाण्याचे पालकमंत्रीही ते झाले होते. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. सकारात्मक नेते अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.