Eknath Shinde News: सरकार स्थापनेसाठी अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांना निरोप, शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून विचारना

किशोर जोरगेवार म्हणाले, राज्याच्या राजकारणात वेगळी घटना घडत आहे. सर्व अपक्ष आमदार बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. काय काय घडत आहे, काय काय होऊ शकते. याचा विचार केला जात आहे. मुख्यमंत्री यांच्याकडून काहीही संपर्क झालेला नाही. ते त्यांच्या कामात व्यस्त असतील. दुसऱ्या गटाकडून म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून संपर्क झाला आहे. कारण नेहमी अपक्षांची भूमिका महत्त्वाची असते, अशं किशोर जोरगेवार म्हणाले.

Eknath Shinde News: सरकार स्थापनेसाठी अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांना निरोप, शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून विचारना
एकनाथ शिंदे, किशोर जोरगेवार
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 12:57 PM

चंद्रपूर : शिवसेनेच्या (Shiv Sena) बंडखोर गटाकडून निरोप आला असल्याची माहिती चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar) यांनी दिली. मुख्यमंत्री आणि मविआ वेगळ्या संकटात असल्याने त्यांचा निरोप आला नसेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेतून फुटून बाहेर आलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला आणखी काही आमदारांचे समर्थन अपेक्षित असल्याची माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाले. अपक्ष आमदार आणि फुटीर शिवसेना यांच्यात वेगळा गट निर्मितीचे प्रयत्न होत आहेत. शिंदे गटाच्या प्रस्तावावर आ. किशोर जोरगेवार निकटवर्तीय आणि चंद्रपूर मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यातील अन्य अपक्ष आमदारांशी बोलणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून संपर्क

राज्यातील घडामोडींकडं आमदारांचं लक्ष आहे. किशोर जोरगेवार म्हणाले, राज्याच्या राजकारणात वेगळी घटना घडत आहे. चंद्रपूर सर्व अपक्ष आमदार बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. काय काय घडत आहे, काय काय होऊ शकते. याचा विचार केला जात आहे. मुख्यमंत्री यांच्याकडून काहीही संपर्क झालेला नाही. ते त्यांच्या कामात व्यस्त असतील. दुसऱ्या गटाकडून म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून संपर्क झाला आहे. कारण नेहमी अपक्षांची भूमिका महत्त्वाची असते, असं किशोर जोरगेवार म्हणाले.

जनतेचा कल घेऊन निर्णय घेणार

माझी भूमिका ही जनतेची भूमिका राहणार आहे. कालपासून मतदारसंघातील जनतेचा विचार घेत आहे. त्यांच्याकडून जो कल येईल. त्यानुसार मला निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळं मी विचार करून निर्णय घेईल. सर्व लोकांनी मतदान करून निवडून दिलं. त्यामुळं त्यांच्या मतांचा विचार करेन, असं किशोर जोरगेवार म्हणाले. मतदारांशी भेटून त्यांची मतं घेऊन रणनीती ठरविणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

अपक्ष आमदारांशी संपर्क सुरू

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडीची सत्ता उलथवून पाडण्याचे प्रयत्न सुरू झालेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळा गट स्थापन केला. या गटात दोन-तृतियांश पेक्षा जास्त आमदार आहेत. शिवाय अपक्षांचा पाठिंबा घेऊन ते भाजपला भेटल्यास नवं सरकार स्थापन करू शकतात. यासाठी अपक्षांशी संपर्क सुरू आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.