नरभक्षक वाघाची दहशत, वन विभागाची तीन पथकं वाघाच्या शोधात

गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Oct 07, 2022 | 10:08 PM

या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी भंडारा वन विभागाने जंगलात कोंबिंग ऑपरेशन सुरू केलंय.

नरभक्षक वाघाची दहशत, वन विभागाची तीन पथकं वाघाच्या शोधात
वन विभागाची तीन पथकं वाघाच्या शोधात
Image Credit source: t v 9

तेजस मोहतुरे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील लाखांदुरात सिटी 1 या नरभक्षक वाघाची दहशत पहायला मिळत आहे. वन विभागाचे (Forest Department) तीन पथकं वाघाच्या शोधात वनवन भटकत आहेत. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्रातून आलेला हा सिटी 1 वाघ जानेवारीपासून भंडारा जिल्ह्यात पोहचला आहे. या वाघाने लाखांदूर तालुक्यातील चार शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे.

मागील आठवड्यात कन्हाळगाव येथील शेतकरी तेजराम कार हे शेतावर गेले होते. यावेळी कार यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांना अक्षरश: दीड किलोमीटर अंतरावर जंगलात फरफटत नेले.

वाघाच्या हल्ल्याचा हा थरारक प्रसंग अवघ्या दोन फूट अंतरावरून बघणाऱ्या तरुणाने वाघाला हुसकावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न कमी पडले. तेजराम यांचा वाघाने त्याच्या डोळ्यासमोर बळी घेतला. तो प्रसंग सांगताना प्रियंक बोरकर याच्या अंगावर शहारा येतो.

दुसरीकडं या नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी भंडारा वन विभागाने जंगलात कोंबिंग ऑपरेशन सुरू केलंय. सहा मचानं उभारण्यात आलेत. जंगलात 61 ट्रॅप कॅमेरे लावून तीन पथकांद्वारे वाघाची शोध मोहीम सुरू आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागरिकांमध्ये पसरलेली दहशत बंद करण्यासाठी वाघाला ठार मारावे किंवा जेरबंद करावे अशी मागणी केली आहे.

लाखांदुरात वाघाची दहशत वन विभागाच्या व परिसरातील ग्रामस्थाच्या जीवाला घोर ठरली आहे. त्यामुळे वेळीच या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI