चिपळूणः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून आणि वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाबरोबर युती केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे अनेक नवनव्या चर्चेना उधान आले आहे. त्यातच पुण्यातील पोटनिवडणुकीवरूनही राजकारण तापले आहे. पु्ण्यातील पोटनिवणुकीवरून महाराष्ट्राची ही संस्कृती नाही अशी चर्चा भाजपने केली होती. त्यावर ठाकरे गटाने भाजपला सोलापूर निवडणुकीची आठवण करून देत त्यावेळी भाजपला ही संस्कृती आठवली नाही का असा सवाल ठाकरे गटाने केला होता. राज्यातील राजकीय घडामोडींना वेगवेगळ्या घटनांवरून प्रचंड वेग आला आहे.
राज्यातील पदवीधर मतदार संघ आणि पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलेले असतानाच स्वतःच्या सोयीनुसार बोलणं ही भाजपची भूमिका असल्याची टीका भास्करराव जाधव यांनी केली आहे.
त्यातच आता काँग्रेसकडूनही पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीविषयी चर्चा केली जात असल्याने महाविकास आघाडी म्हणून भास्करराव जाधव यांनी सांगितले की, तिन्ही पक्षातील नेते याविषयी बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पु्ण्यातील कसबा पेठ्यातून काँग्रेस उमेदवार लढणार असल्याचे नाना पटोले यांनी वक्तव्य केले होते. त्यावरून महाविकास आघाडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
त्यावर बोलताना भास्करराव जाधव यांनी सांगितले की, त्यांनी असे म्हटले असले तरी नाना पटोले हे वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्या उमेदवारीवर वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.
पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे मात्र सोलापूर पोटनिवडणुकीत भाजपने का उमेदवारी भरली असा सवालही भास्करराव जाधव यांनी उपस्थित केला आहे. तर स्वतःच्या सोयीनुसार बोलणं ही भाजपची भूमिका असल्याची टीका भास्करराव जाधव यांनी भाजपवर केली आहे.