सप्तशृंगी गडावर भीषण अपघात, कार दरीत कोसळली, अनेक प्रवाशांचा मृत्यू
नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे, सप्तश्रृंगी गडावर भीषण अपघात झाला आहे, इनोव्हा कार दरीत कोसळली असून, या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. सप्तश्रृंगी गडावर कारचा भीषण अपघात झाला आहे. इनोव्हा कार सप्तश्रृंगी गडावरून दरीत कोसळली या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सप्तश्रृंगी गडाच्या गणपती पॉइंटजवळ हा अपघात घडला आहे. संरक्षण कठाडे तोडून कार खोल दरीत कोसळली, या घटनेत सप्तश्रृंगी मातेचं दर्शन घेऊन घराकडे परतणाऱ्या पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून घटनास्तळी धाव घेण्यात आली आहे. बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे, मात्र ही दरी खोल असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हे सर्व भाविक सप्तश्रृगी मातेचं दर्शन घेऊन घराकडे परत निघाले होते. मात्र वाटेतच काळाने घाला घातला आहे. कार गडावरून थेट दरीत कोसळली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सप्तश्रृगी गडाच्या गणपती पॉइंटजवळ हा अपघात झाला आहे, दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला? अपघाताचं नेमकं कारण काय? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. मात्र चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
बचाव कार्याला सुरुवात
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांकडून घटनास्थळी बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र कार खोल दरीत कोसळल्यानं बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. बचाव कार्य सुरू आहे.
डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
दरम्यान दुसरीकडे मुंबई उपनगरामधील कांदिवलीमध्ये देखील एक भीषण अपघात घडला आहे. कांदिवलीमध्ये एका तरुणाचा डंपरने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. कांदिवली पश्चिममध्ये असलेल्या काळा हनुमान मंदिराजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने तरुणाला इतकी जोरदार धडक दिली की त्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी त्या तरुणाला रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
