AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, उद्धव ठाकरेंना जबर हादरा; अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

Shivsena : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, उद्धव ठाकरेंना जबर हादरा; अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
Shivsena Incomming Image Credit source: X
| Updated on: Apr 08, 2026 | 3:36 PM
Share

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी पक्षांतर केल्याचे समोर आले होते. अनेकांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरली होती. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात कोकणातील अनेकांचा समावेश आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

शिवसेनेत झालेल्या या पक्षप्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, उबाठा गटाचे कोकणातील चिपळूणचे युवासेना विस्तारक, चिपळूण तालुकाप्रमुख उमेश खलाटे, उरणचे उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख विनोद साबळे आणि विदर्भातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील निलहोड नगर पंचायतीतील अपक्ष नगरसेवक सुरेंद्र गौतम यांच्यासह त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी आज हाती भगवा झेंडा घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

चिपळूणमधून विजय शिर्के, ओंकार पंडित, सौ.दिप्ती सावंत देसाई, इकबाल बेबल, विराज खताते, समीर कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुराद चौगुले, वहाब बेबल, सुमित भुरण, दिप्ती भुरण आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. तसेच उरण मधून उपसरपंच अमर म्हात्रे, सुनंदा म्हात्रे, संकल्प घरत, नामदेव ठाकूर, अवधेश महतो, उत्तम चिकणे, समर्थ सोळंकी आणि पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पनवेल जिल्हा महिला अध्यक्षा राजश्री कदम, उपाध्यक्षा बालिकाताई जाधव, असंख्य महिला आणि पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

विदर्भातील अनेकांच्या हाती शिवसेनेचा झेंडा

विदर्भातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील तालुका संघटक गजेंद्र काकडे, तालुकाप्रमुख राजेंद्र गिरडकर, नरेश देवगडे, अनिकेत चित्तराम, नरेंद्र हटेले, वासुदेव चरडे, अक्षय कोलते यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत, अर्थराज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार राजन साळवी, शिवसेना सचिव संजय मोरे, पनवेल मनपा नगरसेवक प्रथमेश सोमण तसेच रत्नागिरी, रायगड आणि विदर्भातील असंख्य शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?