AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नाराजी भोवली, शिवसेना शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली एकनाथ शिंदेंची साथ

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत, त्यापूर्वी शिवसेना शिंदे गटाला राज्यात मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्यानं एकनाथ शिंदे यांची साथ सोडली आहे.

मोठी बातमी! नाराजी भोवली, शिवसेना शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली एकनाथ शिंदेंची साथ
| Updated on: Aug 18, 2025 | 3:41 PM
Share

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, स्थानिक स्वाराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी आपआपल्या स्थरावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान पक्षांतराला देखील वेग आला आहे. अनेक नेते सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.

मात्र आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला राज्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आपल्या गटासह भाजपत प्रवेश करणार आहेत.  शिवाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आहेत.  मात्र पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत शिवाजी सावंत आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी शिवाजी सावंत यांनी फडणवीस यांची गुप्त भेट घेतली, या भेटीनंतर त्यांनी आज भाजपात जाणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन दिवसात शिवाजी सावंत, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी , युवासेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडीचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका, पंचायत समिती आणि झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची सोलापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे.  दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत दिल्या घरी सुखी राहा असा उपरोधिक टोला लगावला आहे.  शिवाजी सावंत आणि त्यांच्यासह भाजपात  जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा हा वैयक्तीत निर्णय असल्याचं यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा