AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, सामुहिक राजीनामे, टेन्शन वाढलं

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं आहे.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, सामुहिक राजीनामे, टेन्शन वाढलं
एकनाथ शिंदे Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 15, 2025 | 3:38 PM
Share

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, निवडणूक आयोगाकडून राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकारणात घडामोडींना वेग आला आहे, राज्यात काही ठिकाणी या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत, काही ठिकाणी स्थानिक समिकरण लक्षात घेऊन युती आघाडीचा निर्णय घेतला जाणार आहे, तर काही ठिकाणी पक्षांनी स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र आता निवडणूक लागताच पदाधिकारी आणि नेत्यांच्या नाराजीचा फटका देखील पक्षांना बसत असल्याचं दिसून येत आहे, मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.

करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांची नियुक्ती होताच शिवसेना शिंदे गटात फूट पडल्याचं पहायला मिळत आहे. बागल गटाकडून सामूहिक राजीनामा देण्यात आला आहे. जयवंत जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिला आहे. जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिला आहे.  हा शिवसेना शिंदे गटासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे.

एवढंच नाही तर  या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले 20 हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे सर्व वीस हजार सभासद आपले राजीनामे पोस्टाने पक्षश्रेष्ठींना पाठवणार असल्याची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.  हा निर्णय शिवसेना शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या सामूहिक राजीनाम्यामुळे करमाळा शहरातील शिवसेना शिंदे गटाची ताकद कमी होण्याची चिन्ह आहेत.

दिग्विजय बागल यांनी यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पक्षात कार्यरत आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळे बागल यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून, आगामी निवडणुकीत बागल गटाला डावलले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे, याच नाराजीतून हे सामूहिक राजीनामा नाट्य घडले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...