AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटात मोठा भूकंप, नेत्याने सोडली उद्धव ठाकरेंची साथ, शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या बड्या नेत्यानं आपल्या शकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटात मोठा भूकंप, नेत्याने सोडली उद्धव ठाकरेंची साथ, शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
uddhav thackeray Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 29, 2026 | 3:16 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे, नेत्यानं आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं, मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत हे यश महाविकास आघाडीला टिकवता आलं, नाही या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला, महायुतीला या निवडणुकीत मोठं यश मिळालं तेव्हापासून शिवसेना ठाकरे गटात गळती सुरू झाली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केला. दरम्यान ही गळती थांबवण्यात अजूनही उद्धव ठाकरे यांना यश मिळालेलं नाहीये.  आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.  शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी आपल्या शकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे.  कल्याण डोंबिवलीत महापालिकेची निवडणूक संपल्यानंतर हा शिवसेना ठाकरे गटासाठी पहिला मोठा धक्का मानला जात आहे.  शिवसेना ठाकरे गटाच्या शहरप्रमुखांनी शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे.  भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रकाश तेलगोटे यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार प्रकाश तेलगोटे हे शिवसेना ठाकरे गटावर नाराज होते, पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मनमानीमुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपात प्रवेश केल्याचं बोललं जात आहे.

महापालिका निवडणुकीत देखील एक दोन महापालिका वगळता शिवसेना ठाकरे गटाला म्हणावं असं यश मिळालं नाही. या निवडणुकीत देखील भाजप हा राज्यात नंबर एकचा पक्ष राहिला तर शिवसेना शिंदे गटाला देखील चांगलं यश मिळालं.  त्यानंतर आता पुन्हा एकदा नेते इतर पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. ही पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता उद्धव ठाकरे यांच्या समोर असणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा