AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; ज्याच्या प्रचारासाठी जीवाचं रान केलं, सभा घेतली त्याच शिलेदारानं उद्धव ठाकरेंची सोडली साथ

शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे, बड्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; ज्याच्या प्रचारासाठी जीवाचं रान केलं, सभा घेतली त्याच शिलेदारानं उद्धव ठाकरेंची सोडली साथ
| Updated on: Jan 25, 2025 | 7:09 PM
Share

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंकडून महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे मात्र पक्षाला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामाना करावा लागला, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. या नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे.  शुक्रवारीच शिवसेना ठाकरे गटाला रत्नागिरीमध्ये मोठा धक्का बसला होता.   शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिला. सचिन कदम कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती, मात्र आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, मी माझ्या वैयक्तिक करणामुळे पक्षाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, त्यानंतर आता जालन्यातील नेत्यानं उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आसाराम बोराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी जालन्यात मोठा धक्का मानला जात असून, या पक्षप्रवेशामुळे जालन्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.

आसाराम बोराडे हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार होते. त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून परतूर, मंठा विधानसभा मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं होतं. आसाराम बोराडे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वत: परतूरमध्ये सभा घेतली होती. मात्र आता आसाराम बोराडे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी हा जोरदार धक्का मानला जात आहे.

Follow Us
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...