AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अखेर पोलिसांची मनोज जरांगे पाटलांना नोटीस, त्या वक्तव्यामुळे अडचणी वाढणार? मुंबईच्या वाटेवरच…

मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या वाटेवर असतानाच आता पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवली आहे.

मोठी बातमी! अखेर पोलिसांची मनोज जरांगे पाटलांना नोटीस, त्या वक्तव्यामुळे अडचणी वाढणार? मुंबईच्या वाटेवरच...
Manoj Jarange PatilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 12:07 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे, मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. त्यांनी 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं प्रस्थान केलं आहे. मंगळवारी त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातल्या पाटोदा येथे होता. आज त्यांचा मुक्काम श्रीगोंदा येथे असणार आहे. मात्र मुंबईच्या वाटेवर असतानाच आता पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवली आहे. जरांगे पाटलांच्या वतीने  उपोषणासाठी देण्यात आलेल्या तिसऱ्या अर्जानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना अधिकृत नोटीस बजावून आंदोलनाबाबतची सविस्तर माहिती तात्काळ सादर करण्यास कळवले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर  उपोषण करण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर उपोषणाला परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज केला होता. परंतु त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाच्या परवानगीसाठी अर्ज केला मात्र दुसऱ्यांदा देखील पोलिसांनी त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली, दरम्यान त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांना अर्ज केला. जरांगे पाटलांच्या वतीने  उपोषणासाठी देण्यात आलेल्या तिसऱ्या अर्जानंतर आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना अधिकृत नोटीस बजावून आंदोलनाबाबतची सविस्तर माहिती तात्काळ सादर करण्यास कळवले आहे.

आंदोलनात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या, वाहनांचा तपशील आणि स्वयंसेवकांची यादी कार्यालयाला देण्यास सांगण्यात आले आहे.  माध्यमांसमोर केलेल्या “परवानगी नाकारली तर कोट्यवधी मराठे मुंबईत येणार” या वक्तव्यातील विरोधाभासावर पोलिसांनी या नोटीसच्या माध्यमातून स्पष्टीकरण मागितले आहे. परवानगी दिल्यानंतर आणखी आंदोलक मुंबईत येणार की कसे हे स्पष्ट करा, असं या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता खालावली आहे, त्यांनी आज दुपारी एक वजाता तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे. ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे वैद्यकीय पथकाकडून त्यांना उपचार घेण्याची विनंती करण्यात येत आहे. परंतु त्यांनी उपाचर घेण्यास नकार दिला आहे.

Follow Us
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
NCP Politics : सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता शिंदेसेनेत प्रवेश करणार
दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या....
CNG Crisis : दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या लांबच लांब रांगा
पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही
NCP Merger : पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान पुण्यात राजकीय खलबतं
सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; संजय राऊतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ
Gokul Milk Price Hike : गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ होण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका