AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीमध्ये मोठी बंडखोरी, भाजपच्या अडचणी वाढल्या, उदय सामंत यांची मोठी घोषणा

राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. अनेक जागांवर महायुतीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील झाली आहे. या पर्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

महायुतीमध्ये मोठी बंडखोरी, भाजपच्या अडचणी वाढल्या, उदय सामंत यांची मोठी घोषणा
uday samantImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 7:51 PM
Share

राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. अनेक जागांवर महायुतीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील झाली आहे. यामध्ये पुणे मतदारसंघातील दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत, तर अमरावतीची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली असून, छत्रपती संभाजीनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराची घोषणा करणार आहे. मात्र त्यापूर्वी आता एक मोठी बातमी समोर आली आहे. उदय सामंंत यांच्याकडून एक मोठी घोषणा करण्यात आली असून, यामुळे आता भाजपच्या अडचणी वाढणार आहेत.

पुण्यामधील दोन्ही मतदारसंघ शिक्षक आणि पदवीधर भाजपच्या वाट्याला आले आहेत. या मतदारसंघातून लढण्यासाठी सुरुवातीपासूनच शिवसेनेचे मंगेश चिवटे हे इच्छूक होते. मात्र आता शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यामुळे या मतादारसंघातून मंगेश चिवटे यांचा पत्ता कट झाला आहे. मात्र जरी उमेदवारी मिळाली नसली तरी देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर मंगेश चिवटे ठाम आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मंगेश चिवटे यांना या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याची बातमी समोर आली होती.

मात्र आता मंत्री उदय सामंत यांच्या घोषणेमुळे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मंगेश चिवटे हे पुणे शिक्षक मतदारसंघामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.  पुणे मतदारसंघावर आमचा दावा कायम आहे, मंगेश चिवटे हे आमचे उमेदवार असतील, ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, भाजपाचा उमेदवार देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करेल. परंतु शेवटचा निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे घेतील असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मंगळवारी मंगेश चिवटे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीमुळे भाजपाचं या मतदारसंघात टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. जर मंगेश चिवटे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला तर या बंडखोरीचा फटका हा भाजप उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे आता ही बंडखोरी मोडून काढण्याचं मोठं आवाहन पक्षासमोर असणार आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात