AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ओमराजेंच्या जिवलग मित्राने गेम फिरवला? एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, मातोश्रीवर घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सहा आमदारांनी बंडखोरी केली आहे, परंतु आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. मातोश्रीवर घडामोडींना वेग आला आहे.

मोठी बातमी! ओमराजेंच्या जिवलग मित्राने गेम फिरवला? एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, मातोश्रीवर घडामोडींना वेग
Omraje NimbalkarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 20, 2026 | 3:18 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी बंडखोरी केली होती. हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या खासदारांनी बंडखोरी केली, त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश होता. मात्र आता आज पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. हा निकाल खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात गेला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी मोठं विधान केलं आहे, मी शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ऑपरेशन टायगर फसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्या या वक्तव्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. ओमराजे यांचे मित्र आणि आमदार कैलास पाटील हे थेट मातोश्रीवर पोहोचले आहेत. मातोश्रीवर घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे ओमराजे यांनी घेतलेल्या तळ्यात -मळ्यात भूमिकेमुळे एकनाथ शिंदे यांचं देखील टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ओमराजे नेमकी काय भूमिका घेणार? शिवसेना ठाकरे गटातच राहणार की? शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

धाराशिवमध्ये तणावाचं वातावरण 

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल समोर आला आहे, या हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. दरम्यान या निकालानंतर धाराशिवमध्ये तणावाचं वातावरण पहायला मिळत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कार्यालय आणि कॉम्प्लेक्स बंद करण्यात आले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष सुटले तर पवनराजे निंबाळकर यांना कोणी मारले? असा सवाल कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील बाणेरमध्ये असलेल्या निवासस्थानी देखील मोठा पोलीसबंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इमारतीच्या बाहेर असलेले सर्व दुकानं बंद करण्यात आले असून, या इमारतीच्या बाहेर वाहन पार्क करण्यास देखील पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी