AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठं ट्विस्ट, ‘ते’ तीनही अधिकारी तोतया

वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होते आहेत, आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठं ट्विस्ट, 'ते' तीनही अधिकारी तोतया
| Updated on: Jun 05, 2025 | 10:32 AM
Share

पुण्यात वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. सासरच्या छळाला कंटाळून तीने आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासू, सासरा आणि नणंद यांना अटक केली, दरम्यान त्यानंतर आहा हगवणे कुटुंबाचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. असंच एक धक्कादायक प्रकरण आता समोर आलं आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि तिची सासू लता हगवणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

प्रशांत येळवंडे यांनी शशांक हगवणे विरोधात फसवणुकीची तक्रार केली होती, जेसीबी व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. 25 लाख रुपयांमध्ये जेसीबीचा सौदा ठरला, आपण शशांक हगवणे याला सुरुवातीला 5 लाख रुपये, दिले त्यानंतर दर महिन्याला जेसीबीचा हाफ्ता भरण्यासाठी 50 हजार रुपये देत होतो, असं  येळवंडे यांनी म्हटलं आहे. मात्र शशांक याने बँकेचा हाफ्ता थकवल्यामुळे हा जेसीबी बँकेने जप्त केला, व तो नंतर शशांक याने सोडवल्याची माहिती समोर आली होती, आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे.

ज्यांनी हा जेसीबी जप्त केला, ते कोणी बँकेचे अधिकारी नसून तोतया होते, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. आपण बँकेचे अधिकारी असल्याचं भासवत या तिघांनी जबरदस्तीने प्रशांत येळवडे यांच्या ताब्यातील जेसीबी मशीन जप्त केलं होतं. या तिघांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आज पाहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.  योगेश राजेंद्र रासकर (वय २५, रा. तळेगाव ढमढेरे),  गणेश रमेश पोतले (वय ३०, रा. मोहितेवाडी), वैभव मोहन पिंगळे (वय २७, रा. तळेगाव ढमढेरे) अशी या प्रकरणातील तोतया बँक अधिकाऱ्यांची नावं आहेत.

पोलिसांनी आधी या प्रकरणात संबंधित बँकेकडे चौकशी केली होती, आम्ही जेसीबी जप्त केला नसल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तिघांनी  बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी चालकाकडून जेसीबी मशीन अनधिकृतपणे ताब्यात घेतली आणि हा जेसीबी आरोपी शशांक हगवणे याच्या ताब्यात दिला. त्यामुळे पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. या तिघांविरोधात फसवणूक, गैरवर्तन व बनावट ओळख सादर करून अनधिकृत ताबा मिळविल्याचा आरोप आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.