Vinayak Mete: ड्रायव्हर फोनवर कुणाशी बोलतोय? CCTV फुटेजमुळे विनायक मेटे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट; लवकरच सत्य बाहेर येणार

विनायक मेटे यांच्या भाच्याने गंभीर आरोप केले आहेत. मेटेंच्या भाच्याने त्यांचा चालक एकनाथ कदमांवर संशय व्यक्त केला आहे. टोलनाक्यावर सीसीटीव्हीत चालक कोणाशी तरी फोनवर बोलतोय. कारचा स्पीडलिमीटही कमी जास्त होत होता. त्यामुळे आमचा संशय बळावला आहे. चालत फोनवर कोणाशी बोलत होता त्याची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांच्या भाच्याने केली आहे.

Vinayak Mete: ड्रायव्हर फोनवर कुणाशी बोलतोय? CCTV फुटेजमुळे विनायक मेटे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट; लवकरच सत्य बाहेर येणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 6:31 PM

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि मराठा समाजातले ही एक महत्त्वाचे नेते विनायक मेटे( Vinayak Mete) यांचे नुकतेच अपघाती निधन झाले आहे. मात्र, त्यांचा अपघात की घातपात? अशा संशय व्यक्त केला जात एका CCTV फुटेजमुळे विनायक मेटे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. विनायक मेटेंसह कारमध्ये उपस्थित असलेला ड्रायव्हर फोनवर कुणाशी तरी फोनवर बोलत असल्याचे या CCTV फुटेजमध्ये दिसत आहे. शिक्रापूर रस्त्यावरील हे सीसीटीव्ही फुटेज आहे. या शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजमधील संभाषणाचा तपास केल्यास सत्य बाहेर येईल असा दावा विनायक मेटे यांच्या नातेवाईकाने केला आहे. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशीचे(CID inquiry ) आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी  दिले आहेत.

विनायक मेटे यांच्या भाच्याचे गंभीर आरोप

विनायक मेटे यांच्या भाच्याने गंभीर आरोप केले आहेत. मेटेंच्या भाच्याने त्यांचा चालक एकनाथ कदमांवर संशय व्यक्त केला आहे. टोलनाक्यावर सीसीटीव्हीत चालक कोणाशी तरी फोनवर बोलतोय. कारचा स्पीडलिमीटही कमी जास्त होत होता. त्यामुळे आमचा संशय बळावला आहे. चालत फोनवर कोणाशी बोलत होता त्याची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांच्या भाच्याने केली आहे. हा घातपात आहे की अपघात याची चौकशी करा एवढीच आमची मागणी असल्याचेही तो म्हणाला.

विनायक मेटे चांगले होते. त्यांच्यासोबत असं कोणी करू शकत नाही. पण चालक त्याचे जबाब सारखे का बदलतोय. आमचा कोणावरही संशय नाही. पण, बाळासाहेब चव्हाण यांच्या उत्तरातही स्पष्टता नसल्याचा दावा मेटेंच्या भाच्याने केला आहे.

हॉस्पीटलमध्ये नेण्याआधीच मेटेंचा मृत्यू

14 ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. 14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर पहाटे साडेपाचच्या सुमारास विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती समजताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले आणि त्यांनी विनायक मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विनायक मेटे यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली होती. यामुळे अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याचं दिसून येत असल्याचे एमजीएमचे मेडिकल संचालक डॉ. कुलदीप संकोत्रा यांनी सांगितलं. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यांचा ईसीजी काढण्यात आला, पण तो पूर्णपणे ब्लँक आला. त्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अपघात नेमका कसा झाला

सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी मेटे यांच्या कारला अपघात झाला. सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी मेटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ भातण बोगद्याच्या साधारण 150 मीटर अगोदर विनायक मेटे यांच्या कारला एका ट्रकने दोरदार धडक दिली. मेटे यांच्या कारला धडक देऊन या ट्रकने थेट पालघरच्या दिशेने पळ काढला होता. त्याच्या मागावर असलेल्या पोलीस पथकांनी सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या सहाय्याने ट्रकचा नंबर शोधून चालकाला ताब्यात घेतले आहे. डीएन 09 पी 9404 असा या ट्रकचा नंबर आहे. उमेश यादव असे चालकाचे नाव आहे. अपघातानंतर ट्रक चालक उमेश यादव ट्रक घेऊन गुजरातमधील वापी येथे पळून गेला होता.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.