Suraj Chavan: माझा देव चोरला! माझ्यासारख्या गरीब मुलाला घर दिलं; अजितदादांच्या निधनानंतर सूरज चव्हाणला अश्रू अनावर

Suraj Chavan: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बिग बॉस विजेता सूरज चव्हाणने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने माझा देव चोरला! असे म्हटले आहे.

Suraj Chavan: माझा देव चोरला! माझ्यासारख्या गरीब मुलाला घर दिलं; अजितदादांच्या निधनानंतर सूरज चव्हाणला अश्रू अनावर
Suraj Chavan
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 28, 2026 | 2:37 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी निधन झाले आहे. अजित पवार हे मुंबईहून बारामती विमानाने प्रवास करत होते. विमान लँडिंग आधी बरामती विमानतळाजवळील एक शेतात कोसळले. त्यानंतर विमानाचा ब्लास्ट झाला. या विमान अपघताता महाराष्ट्राने रुबाबदार नेता गमावला. अजित पवार यांचे भीषण अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बिग बॉस मराठी सिझन पाचचा विजेता सूरज चव्हाणने पोस्ट केली आहे. सूरज हा भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काय आहे सूरज चव्हाणची पोस्ट

सूरज चव्हाणने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो अजितदादांना नमस्कार करताना दिसत आहे. पुढे त्याने अजित दादांचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत सूरजने, मित्रांनो माझा देव चोरला आज. मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत… माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांदून दिलं… माझी काळजी घेतली.. मला नवीन आयुष्य मिळवून दिलं… अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतय…लई दुःख होतंय… माझ्या आई आप्पानंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

नेमकं काय घडलं?

रुबाबदार नेते अजित पवार हे बारामती दौऱ्यावर निघाले होते. पहाटे मुंबईतून बारामतीला निघालेल्या अजित दादांच्या विमानाचा अपघात झाला आहे. विमान आकाशात असताना स्फोट झाला. त्यानंतर विमान थोडे झुकले आणि विमानतळाच्या आधीच एका शेतात कोसळले. त्यानंतर विमानाचे आणखी दोन-तीन स्फोट झाले. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या भीषण अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत विमानात असलेल्या इतर पाच जणांचेही निधन झाले आहे.

अपघातात कोणाचा मृत्यू?

अजित पवार: उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र.

विदिप जाधव: मुंबई पोलीस दलातील हवालदार आणि अजित पवारांचे पीएसओ (PSO).

कॅप्टन सुमित कपूर: विमानाचे मुख्य पायलट (PIC).

कॅप्टन शांभवी पाठक: को-पायलट (FO).

पिंकी माळी: फ्लाईट अटेंडंट.