AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bird flu: बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला, कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह, आता चिकन-अंडी करताना काय करावे?

Bird flu: धारशिवच्या पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने कोंबड्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते.

Bird flu:  बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला, कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह, आता चिकन-अंडी करताना काय करावे?
Bird fluImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 05, 2025 | 2:13 PM
Share

Bird flu: महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. वाशिम जिल्ह्यानंतर आता धारशिवमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. धाराशिवच्या ढोकीमध्ये बर्ड बारा कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे पशुसंवर्धन विभागाने हालचाली वाढवल्या आहे. धाराशिवच्या ढोकी परिसरामध्ये 50 च्या आसपास कावळ्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता.

धारशिव जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणच्या 300 पेक्षा अधिक कोंबड्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागाने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. धारशिवच्या पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने कोंबड्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. आता कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आला आहे.

वाशिममध्ये उपयायोजना

वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जीरापुरे येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर वाशिम जिल्हा प्रशासनाने तातडीनं उपाययोजना सुरु केल्या. बर्ड फ्लू बाधित सर्व कोंबड्यां आणि खाद्य शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. यामुळे मागील 24 तासात वाशिम जिल्ह्यात इतरत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाल्याची नवीन घटना उघडकीस आली नाही, अशी माहिती वाशिमचे अप्पर जिल्हाधिकारी रामेश्वर घुगे यांनी दिली.

बर्ड फ्लूचा धोका वाढल्याने प्रशासनाकडून पोल्ट्री चालकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. पोल्ट्री फार्ममध्ये असलेल्या सुविधांची पाहणी करण्यात येत आहे.

अंडे-चिकन करताना हे लक्षात ठेवा

  • चिकन आणि अंडी 70 डिग्री सेल्सियस तापमानात शिजवून घ्या.
  • कच्ची इन्फेक्टेड अंड्यांचे सेवन करु नका.
  • चिकन शिजवल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्या.
  • बर्ड फ्लूचा प्रभाव असलेल्या 10 किलोमीटर परिसरात राहू नका.
  • सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंग दुखणे अशी लक्षणे असल्यावर रुग्णालयात जा.
  • पक्षी किंवा इतर प्राण्यांचा मृत्यू झाल्यावर त्याची माहिती पशूसंवर्धन विभागाला द्या.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.