AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कावळेच नाही तर कोंबड्या सुद्धा बर्ड फ्लूच्या कचाट्यात; तुम्ही कोणतं चिकन खाताय? विशेष पथकांची धडक कारवाई

Bird Flu Dharashiv and Washim : राज्यात बर्ड फ्ल्यूने अनेक भागात डोके वर काढले आहेत. कावळेच नाही तर कोंबड्या सुद्धा बर्ड फ्लूच्या कचाट्यात सापडल्या आहेत. त्यानंतर जिल्हा पशूसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आला आहे. काय होत आहे घडामोडी?

कावळेच नाही तर कोंबड्या सुद्धा बर्ड फ्लूच्या कचाट्यात; तुम्ही कोणतं चिकन खाताय? विशेष पथकांची धडक कारवाई
बर्ड फ्लूImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 02, 2025 | 1:14 PM
Share

राज्यात बर्ड फ्लूची एका मागे एक प्रकरण समोर येत आहे. ठाणे, उस्मानाबाद, लातूर, चंद्रपूर, वाशीमसह इतर जिल्ह्यात पण ही प्रकरणं समोर येत आहेत.धाराशिव च्या ढोकी परिसरात बोर्ड फ्ल्यूने आतापर्यंत 32 कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहेत. जिल्हाभरातून 300 पेक्षा अधिक कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तर वाशीममधील कोंबड्या सुद्धा नष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चिकन खाताना त्यांची गुणवत्ता आणि दर्जाची खात्री करूनच खा. जिल्हा पशूसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आला आहे. काय होत आहे घडामोडी?

आता 300 कोंबड्यांच्या नमुन्यांची प्रतिक्षा

धाराशिव तालुक्यातील ढोकी परिसरात बर्ड फ्ल्यूने आतापर्यंत 32 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून काळजी घेण्यात येत आहे. जिल्हाभरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या 300 पेक्षा अधिक कोंबड्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागाने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

कोबड्यांची लावली विल्हेवाट

वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा (जिरापुरे) येथील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळले. त्यानंतर बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात आली. संसर्ग वाढू नये यासाठी संशयित क्षेत्रात निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेण्यात आली. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या तीन विशेष पथकांनी जिवंत २६० पक्ष्यांसह पशुखाद्य, ताडपत्री, कुक्कट खताची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली आहे.

तर याच गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये तब्ब्ल ८ हजार कोंबड्यांपैकी ६ हजार ८३१ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. येथील पक्ष्यांचे नमुने संकलित करून ते तपासणीसाठी अकोला, पुणे आणि भोपाळच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. या प्रयोग शाळेच्या तपासणीत कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मृत पक्षी आणि २६० जिवंत कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली. कुक्कुटपालन व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्यात बर्ड फ्लूचा कहर वाढत आहे. लातूर जिल्ह्यातील एका पोल्ट्री फॉर्मवरील 4200 पिल्लं अचानक दगावली होती.अहमदपूर तालुक्यातील ढालेगाव येथील पोल्ट्री फॉर्ममध्ये कोंबडीची पिल्लं दगावली होती. तर उदगीर शहरात 60 कावळ्यांचा मृत्यूची घटना घडली. बर्ड फ्लूमुळेच कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूरी तालु्क्यामधील मंगळी गावतील पोल्ट्री फॉर्मवर काही कोंबड्या दगावल्या होत्या. त्यानंतर हा परिसर सील करण्यात आला होता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.