जेव्हा भाजपचे माजी आमदार अजित पवारांचे आभार मानतात

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तिर्थक्षेत्राच्या विकासाला महाविकास आघाडी सरकारने 14 कोटी रुपये मंजूर केलाय.

जेव्हा भाजपचे माजी आमदार अजित पवारांचे आभार मानतात
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 12:51 PM

नागपूर : रामटेक तिर्थक्षेत्राच्या (Ramtek) विकासासाठी निधी मिळाल्याने, भाजपचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी (BJP Former MLA Mallikarjun Reddy Thanks Ajit Pawar) यांनी अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) आणि उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे आभार मानलेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तिर्थक्षेत्राच्या विकासाला महाविकास आघाडी सरकारने 14 कोटी रुपये मंजूर केलाय. फडणवीस सरकारच्या काळात सात कोटी रुपये निधी देण्यात आला होता, पण नंतर निधी मिळाला नाही (BJP Former MLA Mallikarjun Reddy Thanks Ajit Pawar).

त्यामुळे रामटेक तिर्थक्षेत्रातील विकासकामं थांबली होती. रामटेकचे तत्कालीन आमदारमल्लीकार्जुन रेड्डी यांनी तेव्हा पत्रव्यवहार केला होता. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आशिष जैसवाल यांनीही निधी मिळावा म्हणून पाठपुरावा केला. आता सरकारने 14 कोटी रुपये मंजुर केलेत.

काय आहे रामटेक तिर्थक्षेत्र?

नागपूरपासून 50 कि.मी. अंतरावर रामटेक आहे. प्रभू रामचंद्र आणि सीता मातेच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. दोघेही वनवासात असताना रामटेकमध्येच चार महिने वास्तव्याला होते अशीही अख्यायिका आहे. ते ज्या ठिकाणी राहिले, त्यावरूनच ठिकाणाला नाव पडलं रामटेक.

रामटेकचं अद्भूत मंदिर

तुम्ही रामटेकला गेलात तर अद्भूत असं मंदिर पहायला मिळेल. या मंदिरासाठी वाळूचा एक कणही वापरलेला नाही. असं असतानाही वर्षानुवर्षे मंदिराला कुठलीही अजून तरी इजा पोहोचलेली नाही. स्थानिक यासाठी प्रभू रामचंद्राचा कृपा मानतात.

रामटेक मंदिर परिसरातला अदभूत तलाव

फक्त रामाचं मंदिरच नाही तर मंदिर परिसरातला तलावही अदभूत मानला जातो. ह्या तलावात जे पाणी आहे ते कधीच कमीही होत नाही आणि जास्तही होत नाही. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी आलेले भक्त तलावही आवर्जून बघतात (BJP Former MLA Mallikarjun Reddy Thanks Ajit Pawar).

वीज चमकते आणि रामाचं दर्शन होतं

रामटेकचं मंदिर हे एका पहाडीवर म्हणजेच डोंगरावर बनवलेलं आहे. पावसाळ्यात किंवा इतर ऋतुत जेव्हा मंदिराच्या शिखरावर वीज चमकते त्यावेळेस प्रभू रामचंद्राची प्रतिमा तयार होते अशी धारणा आहे. पावसाळ्यात त्यासाठी भक्तांचे डोळे मंदिराच्या शिखराकडे लागलेले असतात.

BJP Former MLA Mallikarjun Reddy Thanks Ajit Pawar

संबंधित बातम्या :

सोनियांचा लेटरबाँब नाही, संवाद; पत्रावर तिन्ही पक्षांची सारवासारव?

सोनिया गांधींचं पत्रं म्हणजे दबावतंत्र नाही, राऊतांची सावध प्रतिक्रिया; शिवसेना बॅकफूटवर?

Congress : महाआघाडी सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल? ठाकरे सरकारविरोधात काँग्रेसची चक्क दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स?

अजित पवारांनी बाता मारु नये, ते एक ग्रामपंचायत सदस्यही निवडून आणू शकत नाही : निलेश राणे

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.