Sanjay Raut : लॉरेन्स बिश्नोईच्यामागे भाजपमधला कुठला नेता? संजय राऊत यांनी जाहीरपणे नाव घेतलं
Sanjay Raut : "जनतेला गोळ्या मारल्या तरी चालतील. मूळात बॉलिवूडला संरक्षण देण्याची वेळ का येतेय? याचं आत्मचिंतन मुख्यमंत्र्यांनी करावं. मुंबई ही गुंडांच्या हातात गेली आहे. मुंबई बिल्डरांच्या हातात गेली आहे"

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलं ती खरी शिवसेना. ज्या दुसऱ्या शिवसेनेचा उल्लेख केला, ती अजून एका महिन्याभराच्या निकालानंतर कळेल तुम्हाला. ती अमित शाह यांची संघटना आहे. त्यांचा गट आहे. ती अमित शाह यांची दुकानं आहेत” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “परंपरेप्रमाणे उद्धव ठाकरे आजा शिवतीर्थावर मेळावा घेतील. संबोधित करतील. महाराष्ट्रातून, देशातून शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी शिवतीर्थवर येतील. त्याची तयारी पूर्ण झाली आहे” असं संजय राऊत म्हणाले. “महाराष्ट्रात, देशासमोर असंख्य प्रश्न आहेत. रेजीम चेंजचा विषय आहे. रेजीम चेंज विरोधात यलगार आज शिवतीर्थवर दिला जाईल. शेवटी राजकीय पक्ष रस्त्यावतर उतरलेत त्यांचा मूळ हेतू रेजीम चेंज आहे सत्ता परिवर्तन हाच आहे” असं संजय राऊत म्हणाले. “मोदी-फडणवीस हे आंकाड-तांडव करतायत. हो सत्ता बदलायची आहे आम्हाला. तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलात का?. तुम्हाला वेगळा फेविकॉल दिला आहे का?. तुम्हाला जावचं लागेल. जनता रस्त्यावर उतरली आहे. किती लोकांना तुरुंगात डांबणार” असं संजय राऊत म्हणाले.
टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर फडणवीस म्हणाले की घाबरण्याची गरज नाही त्यावर सुद्धा राऊत बोलले. “जनतेला गोळ्या मारल्या तरी चालतील. मूळात बॉलिवूडला संरक्षण देण्याची वेळ का येतेय? याचं आत्मचिंतन मुख्यमंत्र्यांनी करावं. मुंबई ही गुंडांच्या हातात गेली आहे. मुंबई बिल्डरांच्या हातात गेली आहे. हे बिल्डर, गुंड, पोलीस भाजपशी संबंधित आहेत. भाजपचे नम्रसेवक आहेत. लॉरेन्स बिश्नोईला अमित शाह यांचं पाठबळ आहे. हे मी नाही म्हणतय,जग म्हणतय. सलमान खान, बाबा सिद्दीकी, टायगर श्रॉफ, पूर्णेकर यांच्यावर झालेला गोळीबार तुम्ही किती लोकांना संरक्षण देणार आहात. जॅकी श्रॉफ म्हणतो देश सुरक्षित हातो में हैं. आता कळलं देश किती सुरक्षित हातात आहे. टायगर श्रॉफवरच्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री लगेच घरी गेले. त्यांना संरक्षण दिलं जातं. पण पूर्णेकरांच्या घरी गणेश नाईक सोडले तरी कोणी गेलं नाही” असं राऊत म्हणाले.
यावर एकनाथ शिंदे यांचं म्हणणं काय?
“ज्या गुंडांनी पूर्णेकरांना गोळ्या मारल्या, त्यांना गोळीने का उत्तर देत नाही. बदलापूर बलात्काराच्या आरोपीला गोळ्या घातल्या. अन्यथा त्या संस्थेतल्या अनेक गोष्टची उघड झाल्या असत्या. पूर्णेकर कुटुंबिय सांगत आहे, आमच्या वडिलांची हत्या कोणा केली. ते तुमचे कार्यकर्ते आहेत. राजेंद्र शिंदे, मिनाक्षी शिंदे यावर एकनाथ शिंदे यांचं म्हणणं काय?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
