नारायण राणे यांचे निवृत्तीचे संकेत, म्हणाले की,’ कधीतरी…

नारायण राणे यांनी कणकवली भेटी दरम्यान आपल्या दोन्ही मुलांना 'नांदासौख्य भरे' असे सांगत आता राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

नारायण राणे यांचे निवृत्तीचे संकेत, म्हणाले की, कधीतरी...
BJP leader and former MP Narayan Rane hints at retirement
| Updated on: Jan 04, 2026 | 9:14 PM

कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीदरम्यान नारायण राणे पूत्रांमध्ये वादंग निर्माण झाले होते. निलेश आणि नितेश राणे या दोन्ही बंधूंनी एकमेकांच्यावर आणि पक्षावर जोरदार टीका केली होती.आता भाजपा नेते नारायण राणे यांनी दोघांमध्ये काहीही वाद नाहीत आता निवडणूका संपल्या आहेत असे सांगत या वादावर पडदा टाकला आहे. यावेळी त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेतही दिले आहेत.

नारायण राणे यांनी स्थानिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे शक्तिप्रदर्शन केले. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी हे मोठं शक्ती प्रदर्शन केले. या वेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि निलेश राणे कणकवलीत येथे हजर होते.

माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष

नारायण राणे यांनी कणकवलीत भाषण केले. ते यावेळी म्हणाले की आजच्या कार्यक्रमच्या आयोजन करण्यामागचा उद्देश मला माहित नाही. ‘नारा एकच’ हे काय आहे अस मी विचारलं कारण सर्वत्र ‘नारा एकच’ असे बॅनर लागले होते. जेव्हा विचारलं तेव्हा समजले की नारा एकच म्हणजे नारायण राणे हे इथे आल्यावर समजल्याचे राणे म्हणाले. हा मेळावा आयोजित करण्याची वेळ का आली हे समजल नाही. मी भाजपमध्ये आल्यावर सांगितल होतं की भाजप हा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे. एक आहे की मी जगेन तर मानाने जगेन, असं मानणारा आहे असेही राणे यावेळी म्हणाले.

 मला तिकीट नको असं सांगितलं होतं

नारायण राणे म्हणाले की मी सगळी पदे कर्तृत्वाने मिळवलेले आहेत. माझ ध्येय होतं, त्याप्रमाणे मी बदलत गेलो. आपण स्वत: पुरेसे आहोत. कुठल्याही क्षणी काहीही होते. कोण पाठीशी आहे का ? माणसातील माणसांना पैसे मिळवण्याचा मार्ग दाखवा. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही.. मी लोकसेभवर जाण्याआधी सुद्धा मला तिकीट नको असं सांगितलं होतं. मात्र नड्डा यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला राजकारणातून सोडणार नाही.मी घमेंडखोर आहे, मी कोणापेक्षा कमी आहे असं कधीच मानत नाही.  मला त्याचा अभिमान वाटतो.पण आता आता कुठेतरी थांबायला पाहिजे असेही राणे यावेळी म्हणाले.

राणे संपणार नाही..

यावेळी आपल्या मुलांबद्दल बोलताना राणे म्हणाले की राणे विरुद्ध राणे वगैरे असं काही होणार नाही. काहींनी तस करण्याचा प्रयत्न केला. राणे कडून दूर झालात तर कोटी मिळतात अशीही टीका राणे यांनी यावेळी केली. राणेंना संपवायला निघाले त्यांना सांगतो राणे पुरून उरला आहे.माझी रास गुरू आहे. ती स्ट्राँग आहे. मी कार्यकर्त्यांना सांगायला आलो आहे की राणे संपणार नाही. राणेंना संपवायला निघाले त्यांना सांगतो राणे पुरून उरला आहे.माझी रास गुरू आहे.ती स्ट्राँग आहे.मी कार्यकर्त्यांना सांगायला आलो आहे की राणे संपणार नाही.

दोघांना नांदा सौख्यभरे

राणे यावेळी म्हणाले की कुटुंब म्हणून राणे कुटुंब एकत्र राहणार आहे. नितेश आणि राणे यांच्या राजकीय वादावर ते म्हणाले की वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे राजकारण होतं असतं. सगळ्याचं निवडणुकांमध्ये पैसा वाटा ना ? कशाला प्रचार करता ? दोघांनी नांदा सौख्यभरे. निलेश राणे चांगलंचं काम करतात. आणि नितेश राणें दोघही चांगलं काम करतात. निवडणुका आल्या गेल्या की एकत्र व्हायला पाहिजे असेही ते म्हणाले.