‘फडणवीस यांना माझी विनंती एक दिवस प्रचार सोडा…,’ काय म्हणाले अमित ठाकरे ?
राजकारणात कधी असे यापूर्वी झाले नाही. तुम्ही राज्य कुठे नेऊन ठेवलंय हे तुम्हाला कधी कळणार आहे की नाही? असा सवाल मनसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केला आहे.

सोलापूरात निवडणूकीच्या राजकारणातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्यानंतर निवडणूकीचे राजकारण अगदी खालच्या थराला पोहचले आहे. आज मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी दिवंगत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. कधी कोणीही वारल्यावर मी राजकारण करत नाही, आज देखील सांत्वन करायला आलो आहे असे अमित ठाकरे यांनी यावेळी सांगितले. आपल्या सगळ्या राजकारण्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि या गोष्टींचा विचार केला पाहिजे असेही अमित ठाकरे यावेळी म्हणाले.
मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियाची आज सोलापूरात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी संतप्त होत अमित ठाकरे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केली. अशा निवडणूका जिंकायच्या असतील तर आम्हाला निवडणूक नको, आम्ही माघार घेतो असे उद्वीग्न होत अमित ठाकरे म्हणाले. पैसे देऊन फॉर्म परत घेण्यापर्यंत सर्व ठीक होतं. मात्र आता खून करू लागले आहेत.समोरच्या पक्षातल्या लीडरकडे देखील मुलं-मुली आहेत. मी जसं बघितलं तसं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी याकडे बघावं. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपलं राज्य कुठे चालले आहे त्यांनी पाहिले पाहिजे.
एक आई, दोन मुली आज अस्थि विसर्जन करून आले आहेत, ही कोणती परिस्थिती आहे? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे , बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून दहा मिनिटे मला वेळ द्यावा मी सर्व विषय त्यांच्यासमोर मांडेन असेही अमित ठाकरे म्हणाले.सोलापूरकर म्हणून विचार केला पाहिजे, कुठे नेऊन ठेवतोय आपलं शहर याच उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिले पाहिजे.
बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे
बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार आहे. त्यांना सर्व परिस्थिती सांगणार आहे.आपलं राज्य असं असू शकत नाही. तुम्ही जिंकले मज्जा करा, पण खुन करू नका. त्यांच्या परिवाराची काळजी करू नका..मला आर्थिक गोष्टी इथं करायच्या नाहीत. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेणार आहे. भाजपाची पातळी एवढी खाली गेली आहे. निवडणुकीसाठी ते खुन करताहेत..अशा निवडणुका होत असतील तर नको अशा निवडणुका.आम्ही सर्व मागार घेतो तुम्ही जिंका. फडणवीस साहेबांना विनंती आहे त्यांनी एक दिवस प्रचार सोडून इकडे या असेही अमित ठाकरे यावेळी म्हणाले.
