AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर संजय मांजरेकरने मीठ चोळलं! दक्षिण अफ्रिकेचे आभार मानत म्हणाला…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारताचा दारूण पराभव झाला आहे. दक्षिण अफ्रिकेने भारताला 76 धावांनी पराभवाची धूळ चारली आहे. या पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठली आहे. यात माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी तर थेट दक्षिण अफ्रिकेचा आभार मानले आहेत. त्याचं कारण असं की...

टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर संजय मांजरेकरने मीठ चोळलं! दक्षिण अफ्रिकेचे आभार मानत म्हणाला...
टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर संजय मांजरेकरने मीठ चोळलं! दक्षिण अफ्रिकेचे आभार मानत म्हणाला...Image Credit source: PTI
| Updated on: Feb 23, 2026 | 4:35 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. पण सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर उपांत्य फेरी गाठेल की नाही याबाबत शंका आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाला पहिल्यांदाच 76 धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. इतक्या मोठ्या फरकाने पराभव झाल्याने नेट रनरेटचं गणित चुकलं आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर याने टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. इतकंच काय तर दक्षिण अफ्रिकेचे आभारही मानले आहेत. संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दक्षिण अफ्रिकेचे आभार व्यक्त केले आहेत. कारण त्यामुळे टीम इंडियाला मोठा धडा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच पुढे काय करायला हवं? याबाबत समजवून फुंकरही घातली आहे.

संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘दक्षिण अफ्रिकेचे आभार, कारण त्यांच्यामुळे टीम इंडियाला पुढे काय करायचं ते कळलं आहे. फलंदाजांना फिरकीविरुद्ध चांगल्या तंत्रासह खेळावं लागेल. थ्रो डाउन सरावात स्लोअर चेंडूंचा जास्तीत जास्त सराव करावा लागेल. तसेच कुलदीप यादवला निश्चितच संधी दिली पाहिजे.’ टीम इंडियाच्या दारूण पराभवाला फलंदाजांची हाराकिरी समोर आली आहे. कारण भारतीय फलंदाजांनी फिरकी आणि स्लोअर चेंडूंसमोर गुडघे टेकले.

इशान किशन ऑफ स्पिनर एडन मार्करमसमोर काहीच करू शकला नाही. त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे टीम इंडियावर पहिल्या षटकापासून दबाव वाढला. दुसरीकडे, आक्रमक फलंदाज अभिषेक शर्माला स्लोअर चेंडूवर फसवलं. 15 धावांवर असताना मार्को यानसेनने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तिलक वर्माची स्थिती काही वेगळी नाही. त्याने फक्त 1 धाव केली. तर कर्णधार सूर्यकुमार यादव 18 धावा करून बाद झाला. भारताविरुद्ध केशव महाराजने 3, मार्को यानसेनने 4 आणि कॉर्बिन बॉशने 2 विकेट घेतल्या. या स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी आणखी एक नकोसा विक्रम रचला आहे. भारताचे फलंदाज 11वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...