AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

0,0,0,0,0,0,0,0,0,0,0… टीम इंडियाच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड, पाच सामन्यात झालं असं

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. भारतीय संघाचा 76 धावांनी पराभव झाल्याने उपांत्य फेरीची वाटही बिकट झाली आहे. असं असताना भारतीय फलंदाजांनी शून्यावर बाद होण्याचा विक्रम रचला आहे.

0,0,0,0,0,0,0,0,0,0,0… टीम इंडियाच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड, पाच सामन्यात झालं असं
0,0,0,0,0,0,0,0,0,0,0… टीम इंडियाच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड, पाच सामन्यात झालं असंImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 23, 2026 | 3:48 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारताच्या पदरी पहिल्याच सामन्यात निराशा पडली आहे. दक्षिण अफ्रिकेने टीम इंडियाला 76 धावांनी पराभवाची धूळ चारली. यामुळे भारताचं नेट रनरेटचं गणित बिघडलं आहे. दक्षिण अफ्रिकने 187 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय संघ 111 धावांवरच गारद झाला. या पराभवासह भारताने एक लाजिरवाणा पराभवही आपल्या नावावर केला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम रचला आहे. जागतिक क्रमवारीत नंबर 1 असलेल्या संघाचे फलंदाज 11 वेळा शून्यावर बाद झाले आहे. यात अभिषेक शर्माचं नाव आघाडीवर येत आहे. त्याला या स्पर्धेत तीन वेळा खातंही खोलता आलं नाही. अक्षर पटेल दोन वेळा शून्यावर बाद झाला. तर शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि रिंकु सिंह प्रत्येकी 1 वेळा शून्यावर बाद झाले आहे.

टीम इंडियाचे फलंदाज इतक्यांदा शून्यावर बाद झाल्याने दुबळ्या इटली संघालाही मागे टाकलं आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी जागतिक पातळीवर पुरती लाज घालवली आहे. इटली संघाने पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामुळे त्यांच्या कामगिरीची तुलना आता करता येणार नाही. पण भारताने त्यांनाही मागे टाकलं आहे. इटलीचे फलंदाज 8 वेळा शून्यावर बाद झाले होते. तर ओमानचे फलंदाज 7 वेळा आणि पाकिस्तानचे 6 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. त्यामुळे या सर्वांना मागे टाकत भारतीय संघ आघाडीवर आहे. खरं तर भारतीय संघाचा टी20 क्रिकेटमधील दबदबा पाहता ही लाजिरवाणी बाब आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या तीन फलंदाजांना खातं खोलता आलं नाही. यात फॉर्मात असलेला इशान किशनचा नंबर पहिल्या स्थानावर आहे. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. इशान किशननंतर रिंकु सिंह आणि जसप्रीत बुमराह हे देखील शून्यावर बाद झाले. त्यामुळे भारताचा डाव 111 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताची पुढची वाट बिकट झाली आहे. भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळवायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेच्या कामगिरीवर सर्व काही अवलंबून असणार आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?