AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDIA | ‘मातोश्रीची खरी मम्मी उद्या येतेय’, भाजपा नेत्याने वापरले टोचणारे शब्द

INDIA | इंडिया आघाडीची उद्या आणि 1 सप्टेंबरला मुंबईत बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदाराने बोचरी टीका केली आहे. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. संजय राऊत भाजपामध्ये यायला तयार होते, असा सुद्धा दावा केला.

INDIA | 'मातोश्रीची खरी मम्मी उद्या येतेय', भाजपा नेत्याने वापरले टोचणारे शब्द
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 12:15 PM

मुंबई : “इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी, राहुल गांधीं हे नेते मुंबईत येत आहेत, त्यांच्या राज्यात लव जिहादच्या केसेस होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अन्याय होत आहे, याचा जाब उद्धव ठाकरे विचारणार का ?” असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे. “बाळासाहेबांनी बांग्लादेशींविरोधात पाऊल उचलले. माझा बाप चोरला अशी भूमिका मांडणारे उद्धव ठाकरे बाळासाहेबांची भूमिका निभावणार का?” असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे. “कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यापासून, हिंदूंवर अन्याय वाढले आहेत. सगळे नेते त्यांना जाब विचारतील का ?” असं नितेश राणे म्हणाले.

“संजय राऊत यांनी नीती आयोगाबाबत टीका केली. मुंबई महाराष्ट्र राज्यापासून तोडणार असा जुना टेपरेकॉर्डर सुरू आहे. मोदी व शाह नसते, तर ठाकरे कुटुंबीयांनी मुंबई विकली असती. मुंबईला पाटणकर व सरदेसाई यांच्याकडून धोका आहे” असं नितेश राणे म्हणाले. “या बैठकींचा काही परिणाम होणार नाही. मुंबईला कोण गिळत होतं, तर ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी” अशी टीका नितेश राणे यांनी केली. “मुंबई मोदी-शाह-फडणवीस यांनी वाचवली. लाचार कोण? पळपुटा, खोटारडा कोण? हे सर्वांना माहीत आहे” असं नितेश राणे म्हणाले.

‘मातोश्रीची खरी मम्मी उद्या येतेय’

मातोश्रीची खरी मम्मी उद्या येतेय असं नितेश राणे म्हणाले. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेसचे आणि विरोधी पक्षाचे नेते मुंबईत येत आहेत. “संजय राऊत याने अनेक भाकीतं केली. त्यातील एकही भाकीत खर झालं नाही. अटक होण्याच्या भीतीने हे बोलत आहेत. संजय राऊत जेलमध्ये बसणार” असं नितेश राणे म्हणाले. कालीचरण महाराज यांचे विचार योग्य आहेत. माझा त्यांना पाठिंबा आहे असं नितेश राणे यांनी सांगितलं. ‘राजाराम राऊतची दोन्ही मुलं खोटारडी’

“सुनील राऊत याला पक्षात घ्यायला कोणी 100 कोटी नाही, तर 100 रुपये पण देणार नाही” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. “राजाराम राऊतची दोन्ही मुलं खोटारडी आहेत. संजय राऊत जेलमध्ये असताना हा सुनील राऊत अमित शाहंच्या कार्यालयाबाहेर व भाजप कार्यालयाबाहेर चार चार तास थांबून होता. आम्ही भाजपात प्रवेश करतो पण माझ्या भावाला सोडा अस सांगत होता” असा दावा नितेश राणे यांनी केला.

बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.