AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना ओपन चॅलेंज, ‘तुम्ही…’

Devendra Fadnavis : सरकारने आता लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जाहीरनामा कसा असेल? त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी अशा पल्लवीत करणारं सूचक वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना ओपन चॅलेंज, 'तुम्ही...'
devendra fadnavis
| Updated on: Oct 16, 2024 | 2:52 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारने आज पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. “शरद पवारांना आव्हान करतो की, त्यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगावा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुतीचा जागावाटापचा फॉर्म्युला काय असणार? त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘लवकरच सांगू’. “वेगवेगळ्या घटकांनाही दिलासा दिला आहे. कोतवाल, अंगणवाडी सेविका, आशाताई वर्कर प्रत्येक घटकाला आपण दिलासा दिला. होमगार्डचं मानधन दुप्पट केलं. त्यांच्याही जीवनात परिवर्तन केलं. आगरी, कोळी, गवळी समाज, शिंपी, सोनार, लोहार, आर्यवैश्य, तेली समाज असेल प्रत्येकाचे आपण महामंडळ तयार केलं आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख तरुणांना उद्योगपती केलं आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“वृत्तपत्र विक्रेत्यांनाही आपण पहिल्यांदाच दिलासा दिला आहे. आपण पायाभूत सुविधांचं काम केलं आहे. समृद्धी महामार्ग, ग्रामीण महामार्ग, नवीन महामार्ग आदी कामे केली आहे. पायाभूत सुविधेच्या क्षेत्रात केलेलं काम अभूतपूर्व आहे. वाढवण बंदर हे महाराष्ट्राला 25 ते 30 वर्ष राज्याची आणि देशाची अर्थव्यवस्था हे बंदर चालवेल. जेएनपीटीपेक्षा तीन पट मोठं बंदर आहे. जगातील 10 बंदरांपैकी एक आहे. यातील सर्व अडचणी आपल्या सरकारने दूर केल्या आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘विरोधक कन्फ्यूज आहेत’

“विरोधी पक्ष लाडकी बहिणीवर टीका करतो. मुलींना मोफत शिक्षण देणार कुठलं सांगत आहे. सरकारकडे पैसे नाही. पण त्यांचे नेते म्हणतात, आमचं सरकार आलं की आम्ही 2 हजार रुपये देऊ. मग विरोधकांनी ठरवलं पाहिजे सरकारकडे आहे की नाही. आम्ही काही योजना सांगितल्या आहेत. आणखी योजना जाहीरनाम्यात देणार आहोत. विरोधक कन्फ्यूज आहेत. सरकारकडे पैसे नाही म्हणतात आणि नवनवीन योजना विरोधक सुरू करत आहेत” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. आणखी योजना जाहीरनाम्यात देणार आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. म्हणजे आणखी काही समाजकल्याणकारी योजनांची घोषणा महायुतीकडून होऊ शकते.

Follow Us
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ