NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरण चर्चेवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, तटकरेंच्या त्या प्रतिक्रियेवर भूमिका समोर!

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. खासदार शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना भेटायला अनेक नेते मंडळी रुग्णालयात जात आहेत.

NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरण चर्चेवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, तटकरेंच्या त्या प्रतिक्रियेवर भूमिका समोर!
sharad pawar and sunetra pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2026 | 9:20 PM

NCP Merger Update : खासदार सुनिल तटकरे यांच्या विधानानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अजितदादा असते तर 12 फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झाले असते, असे सांगून तटकरे यांनी राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर शरद पवार यांच्या पक्षाचे नेते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. दरम्यान, यावर आता भाजपाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

गिरीश महाजन काय म्हणाले?

भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी सुनिल तटकरे यांच्या विधानावर भाष्य केलंय. तटकरे यांचे वक्तव्य म्हणजे जर तरचा विषय आहे. सुनिल तटकरे यांचे हे वैयक्तिक मत आहे. हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. त्यामुळे तटकरे बोलले असतील, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिलीय. यावर आता भाजपातील वरिष्ठ नेत्यांची भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...

सुनिल तटकरे नेमकं काय म्हणाले?

सुनिल तटकरे यांनी अगोदर अजितदादा यांनी आम्हाला विलिनीकरणाबाबत काहीही सांगितलेले नाही, असं अनेकवेळा उघडपणे बोलून दाखवलेलं आहे. आता मात्र त्यांनी ही चर्चा झाली होती, असं सांगितलंय. “विलिनीकरणाची चर्चा झाली होती. अजितदादांनी मला त्याची कल्पना दिली होती. विलिनीकरण कसे होईल, हे मला त्यांनी निश्चितपणे सांगितलं होतं. दादा असते तर 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनिकरण झाले होते,” असं मोठं विधान त्यांनी केलंय.

गेल्या काही दिवसांत नेमकं काय घडलं?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. खासदार शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना भेटायला अनेक नेते मंडळी रुग्णालयात जात आहेत. अजित पवार यांच्या पक्षातील खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर तटकरे यांनी विलिनीकरणावर भाष्य केलंय. याआधी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतली. या भेटीवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार नव्हते. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us