‘मला फसवण्याचा कट, माझ्या गाडीत गांजा टाका…’, गिरीश महाजन यांचा खळबळजनक खुलासा

मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वादा प्रकरणी छापेमारी प्रकरणात दाखल गुन्ह्यात जळगाव शहर पोलिसांनी रविवारी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.

'मला फसवण्याचा कट, माझ्या गाडीत गांजा टाका...', गिरीश महाजन यांचा खळबळजनक खुलासा
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 5:07 PM

मुंबई : मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वादा प्रकरणी छापेमारी प्रकरणात दाखल गुन्ह्यात जळगाव शहर पोलिसांनी रविवारी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना आज जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणावर भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांच्यावर गंभीर आरोप केले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पेनड्राईव्हचा देखील उल्लेख केला. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुद्दा उपस्थित केला. मला फसवण्याचा कट होता. माझ्या गाडीत गांजा टाका, मेडिकलमध्ये काही काढा, असं प्रविण चव्हाण बोलत होते, पेनड्राईव्ह आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.

गिरीश महाजन यांनी उल्लेख केलेलं पेनड्राईव्ह प्रकरण तेच आहे जे गेल्यावर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान मांडलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे थेट पेन्ड्राईव्ह जमा करत खळबळ उडवून दिली होती. या पेन्ड्राईव्हमध्ये विशेष सरकारी वकील यांचं संभाषण होतं. चव्हाण यांनी गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी प्लॅन आखल्याचा दावा त्यांनी केला होता.

याच प्रकरणी प्रवीण चव्हाण यांना काल पोलिसांनी अटक केलीय. त्यांना आज जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. या कारवाईनंतर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी गिरीश महाजन यांनी खळबळजनक दावा केला आहे.

हे सुद्धा वाचा

गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

“माझ्यावर मोक्का लावला. मला मानसिक त्रास झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंच्या मतदारसंघात केस दाखल केली. सीबीआय चौकशी सुरू आहे. जे प्लानर आहेत, त्यांची नावे समोर येतील. चार पाच लोकांना बळजबरी घालायचं. प्रविण चव्हाण वारंवार बोलत आहेत, त्यांचा हात आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले. “प्रविण चव्हाण यांना अटक झालीय. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होईल. ते खडसेंचं नाव घेत होते. सगळं समोर येईल, सत्य समोर येईल, मला न्याय हवा”, असंदेखील ते म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी एक पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला होता. कशाप्रकारची कट कारस्थानं सरकार शिजवतयं त्याची उदाहरणं आणि पुरावे मी या पेन ड्राईव्हमध्ये दिले आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं होतं. गिरीश महाजनांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला. 2021 मध्ये असा गुन्हा दाखल केला की 2018 मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका वादाबाबत भोईटे गटाच्या वतीनं महाजनांचे स्वीय सहायक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या एकाचं अपहरण केलं. मग गिरीश महाजनांचा फोन आला त्यांनी धमकी दिली. त्या आधारावर त्याला सांगण्यात आलं की तू त्या विद्या प्रसारक मंडळाचा राजीनामा दे. त्यावर आम्हाला यायचं आहे. अशाप्रकारची अत्यंत बनावट केस तयार केली. त्या पलिकडे जाऊन गिरीश महाजनांचा मोक्का लागला पाहिजे म्हणून तशी कागदपत्र गोळा केली गेली. पण महाजनांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले होते.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.