पूजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे: पंकजा मुंडे

तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. | Pankaja Munde

पूजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे: पंकजा मुंडे
pankaja munde

बीड: पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरुन सुरु असलेल्या राजकीय वादात आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी उडी घेतली आहे. पूजा चव्हाण (Pooja Chavan) ही माझ्या मतदारसंघातील तरुणी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. (Pankaja Munde reaction on Pooja Chavan suicide case)

तत्पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली. या तरुणीने आत्महत्या करुन 48 तास उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार द्यायला हवी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण राज्य सरकारला सुमोटो तक्रार दाखल करुन घेता येत नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

भाजपच्या महिला आघाडीकडून पोलिसांकडे तक्रार

पूजा चव्हाणनं विदर्भातल्या एका मंत्र्यासोबतच्या प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा होती. त्याची चौकशी करा म्हणून भाजपच्या पुण्यातल्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षांनी आयुक्तांना निवेदनही दिलं आहे. पण संबंधित मंत्र्यांचं थेट नाव कुणीही घेतलेलं नव्हतं. ना ते तक्रारीत आहे ना, कुठे एफआयआरमध्ये. पण आता भाजपा त्या मंत्र्याचं नाव उघड करताना दिसते आहे.

मुळची परळीची असलेल्या पुजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली आहे. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली होती.

संंबंधित बातम्या :

परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक

बीडच्या 22 वर्षीय तरुणीची पुण्यात आत्महत्या, तर्कवितर्कांना उधाण

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजप आक्रमक, संबंधित मंत्र्याचं ‘राठोडगिरी’ असं नाव घेत पहिल्यांदाच थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

(Pankaja Munde reaction on Pooja Chavan suicide case)

Published On - 4:51 pm, Thu, 11 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI