AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सकाळी उठल्यावर संजय राऊतांना रोज 9 वाजता बाग द्यावा लागतो, नाही दिला तर..’, दानवेंचा जोरदार पलटवार

संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता, आता या टिकेला भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर देताना जोरदार निशाणा साधला आहे.

'सकाळी उठल्यावर संजय राऊतांना रोज 9 वाजता बाग द्यावा लागतो, नाही दिला तर..', दानवेंचा जोरदार पलटवार
| Updated on: Nov 09, 2024 | 5:19 PM
Share
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती.  विधानसभा निवडणुकीत गुंडांच्या टोळ्या सक्रिय म्हणत त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला होता. दरम्यान त्यानंतर आता संजय राऊत यांच्या या टीकेवर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी जोरदार पलटवार केला आहे. ‘सकाळी उठल्यावर नऊ वाजता संजय राऊत यांना बाग द्यावा लागतो, तो जर दिला नाही तर त्यांना संध्याकाळी भाकर भेटत नाही’ असा टोला दानवे यांनी लगावलाय आहे.  ते काय बोलतात याकडे  आम्ही लक्ष देत नाही, असंही यावेळी दानवे यांनी म्हटलं आहे, ते शेवगावमध्ये बोलत होते.
दरम्यान बटेंगे तो कंटेंगे असा प्रचार करत भाजपने समाजा-समाजात तेढ निर्माण करू नये असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्याला देखील दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खऱ्या  अर्थाने राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेच जाती-जातीत तेढ निर्माण करून, मतं मिळवण्याचे काम केले आहे.  सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे धोरण जर कुणी वापरलं असेल तर ते पंतप्रधान मोदींनी वापरलं असं दानवे यांनी म्हटलं आहे.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्राचारार्थ शेवगाव येथे प्रचार सभा घेण्यात आली, त्यावेळी दानवे बोलत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील या सभेला उपस्थिती होती.  सभेनंतर माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी म्हटलं की या विधानसभा निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला खुप चांगले वातावरण आहे. तसेच लोकसभेत जे वातावरण होते त्याच्या विपरित वातावरण असून याचा महायुतीला चांगला फायदा होईल. महायुतीच्या 185 जागा निवडून येतील असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. आता संजय राऊत हे दानवे यांच्या टीकेला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?