AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कुणी जागा मागितली म्हणून देता येत नाही’, सुधीर मुनगंटीवार यांचं जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप महाराष्ट्रात जवळपास 36 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. तर अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आपल्याला मिळाव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

'कुणी जागा मागितली म्हणून देता येत नाही', सुधीर मुनगंटीवार यांचं जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 06, 2024 | 5:39 PM
Share

मुंबई | 6 मार्च 2024 : महायुतीच्या जागावाटपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल आणि आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांनी महाराष्ट्राच्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठकही पार पडली आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत महत्त्वाची चर्चा झालीय. त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजपच्या राज्यातील नेत्यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक पार पडणार आहे. ही बैठक संध्याकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आली. तर रात्री राज्यातील नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीला भाजपचे तीन माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष उपस्थित असणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महाराष्ट्र प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार बैठकीला उपस्थित असणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप महाराष्ट्रात जवळपास 36 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. तर अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आपल्याला मिळाव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “जागा कुणी मागितली म्हणून द्यायची नसते आणि जागा कुणी मागितली नाही म्हणून थांबायचं नसतं”, असं महत्त्वाचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?

“जागेची वाटाघाटी ही चाणाक्ष कॅमेऱ्याच्या समोर कधीच होत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट जागेच्या वाटाघाटीबद्दल जेव्हा आपलं मत व्यक्त केलं जातं त्या मतावर आधारित वाटाघाटी कधीही कदापि होत नसतात. विजयाच्या दृष्टीने त्या मतदारसंघाचं विश्लेषण करुन सुश्म अध्ययन करुन, त्या संदर्भातलं सर्वेक्षण करुन, त्या ठिकाणी असणाऱ्या जनतेचा मनोभाव बघत आपण निर्णय घेतो. कारण आपल्याला विजयाकडे जायचं असतं. जागा कुणी मागितली म्हणून द्यायची नसते आणि जागा कुणी मागितली नाही म्हणून थांबायचं नसतं”, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

हेही वाचा : भाजप तब्बल 36 जागा लढणार? मित्रपक्षांचाही पत्ता कट होण्याचे संकेत, बडे नेते दिल्लीला रवाना

दिल्लीच्या बैठकीबाबत सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला असता, तो आमच्या पक्षाचा भाग आहे. बैठकीच्या संदर्भात चॅनलच्या माध्यमातून चर्चा करणं योग्य नाही, असं मत त्यांनी मांडलं. “महायुतीच्या जागा रखडल्याच नाही. भाजप महाराष्ट्रातील जागांबाबत लवकरच निर्णय करणार आहे. एकूणच देशाच्या बाबतीत 195 जागा आम्ही घोषित केल्या आहेत. भाजपचा पहिला नंबर आहे. 195 जागा घोषित आहे. दुसरी यादी चार-पाच दिवसात निघेल, अशी अपेक्षा आहे”, असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलं.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल