AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात; पंढरपूरला दर्शनाला जाताना घडली दुर्घटना

भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात; पंढरपूरला दर्शनाला जाताना घडली दुर्घटना

भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात; पंढरपूरला दर्शनाला जाताना घडली दुर्घटना
| Updated on: Jul 20, 2026 | 8:32 AM
Share

सोलापूरमधून मोठी बातमी हाती आली आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात ही घटना घडली आहे. या कारमध्ये आमदार नारायण कुचे नव्हते. तर त्यांचे चालक, सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी होता. अपघाताच्या या घटनेने महामार्गावर एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नारायण कुचे आणि त्यांचे सहकारी छत्रपती संभानीनगरवरून पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त विठुरायांच्या दर्शनाला जात असताना ही घटना घडली. धोकादायक वळणावर कार नियंत्रित न झाल्यामुळे उलटल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेत कारचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

नेमकं काय घडलं?

आषाढी वारी सोहळा सुरू आहे. राज्यभरातील नेते मंडळी पंढरीच्या विठुरायांच्या दर्शनासाठी जात आहेत. आमदार कुचे देखील पंढरपूरला विठुरायांच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांच्या ताफ्यात अनेक गाड्या होत्या. ताफ्यात पंढरपूरला जाताना आमदार कुचे त्यांच्या कारमध्ये बसले नव्हते. त्यांच्या कारमध्ये चालक, सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी बसला होता. ते कारमध्ये नसल्याने अपघातामधून बचावले. या अपघतात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या घटनेविषयी आमदार नारायण कुचे यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावून आले. त्यांनी तातडीने कारमधील तिघांना सुरक्षित ठिकाणी नेले. तसेच रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी देखील सुरळीत केली.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावरही मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. वर्ध्यातील विरुळ गावात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मालावाहू वाहनाने कारला धडक दिली. त्यानंतर कारने पेट घेतला. या घटनेत कारमधील 4 जणांचा मृत्यू झाला. तर मालवाहू वाहनातीलही एकाचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...