भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ, गंगापूर साखर कारखाना अपहार प्रकरणी सभासदांचा जामीन फेटाळला

भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ, गंगापूर साखर कारखाना अपहार प्रकरणी सभासदांचा जामीन फेटाळला

औरंगाबाद खंडपीठाने गंगापूर सहकारी कारखाना निधी अपहार प्रकरणी सहा जणांचे अर्ज फेटाळल्याने आमदार प्रशांत बंब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. (Prashant Bamb colleagues bail plea)

अनिश बेंद्रे

|

Jan 21, 2021 | 9:20 AM

औरंगाबाद : भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गंगापूर सहकारी साखर कारखान्यातील (Gangapur Co operative Sugar Factory) 15 कोटी 75 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात सहा जणांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी निर्णय दिला. गंगापूर सहकारी साखर कारखान्यातील अपहार प्रकरणात प्रशांत बंब यांच्यासह सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात दाखल बंब यांच्या सहा सहकाऱ्यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. (BJP MLA Prashant Bamb colleagues bail plea rejected by Aurangabad bench)

फिर्यादीच्या वतीने कोर्टात ऑडिट रिपोर्ट सादर

औरंगाबाद खंडपीठाचे सरकारी वकील अॅड. डी आर काळे यांनी पोलिसांच्या वतीने बाजू मांडताना मनी लॉन्ड्रिंग आणि खोटे दस्तऐवज तयार केल्याचे सांगितले. फिर्यादी कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांनी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे ऑडिट रिपोर्ट, पोटनियम, खोटे अधिकार पत्र, मुखत्यार पत्र बाबत सविस्तर विवेचन करुन या प्रकरणातील गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने सहा जणांचे अर्ज फेटाळून लावल्याने आमदार प्रशांत बंब यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

वैजापूर जिल्हा न्यायालयाकडूनही दिलासा नाही

गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणातील सहा सदस्यांनी वैजापूर जिल्हा न्यायालयातही जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र आदल्या दिवशीच न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे सभासदांवर अटकेची टांगती तलवार होती. आता खंडपीठानेही जामीन नाकारल्याने प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे.

गंगापूर कारखान्यात निधीची अफरातफरीचा आरोप

औरंगाबादमध्ये आमदार प्रशांत बंब यांच्यासह सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बंब हे या गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. बंब हे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात कारखान्यात निधीची अफरातफर झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रशांत बंब यांनी बनावट कागदपत्रं तयार करुन सभासदांची फसवणूक करत 15 कोटी 75 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर कारखान्यातील सभासदांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल केला गेला.

काय आहे प्रकरण?

गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते. ते पुन्हा कारखान्याच्या खात्यावर आले. तेव्हा ही रक्कम 15 कोटी 75 लाख होती. पण, खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही असं कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितलं. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे. (BJP MLA Prashant Bamb colleagues bail plea rejected by Aurangabad bench)

14 सभासदांची फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांची डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले होते. पण, त्यानंतर विक्रीचा व्यवहार रद्द झाला. म्हणून कोर्टाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले. यावर प्रशांत बंब आणि त्यांच्यासह काही जणांनी यावर कारखान्याचे पैसे नसल्याचं म्हटलं. या प्रकरणात 14 सभासदांची फसवणूक झाल्याचाही आरोप आहे.

संबंधित बातम्या :

भाजप आमदारासह 16 जणांवर गुन्हा दाखल, 15 कोटी 75 लाखांचा अपहार केल्याचा आरोप

माफी मागा अन्यथा 23 कोटींचा दावा दाखल करु, प्रशांत बंब यांची चिखलीकरांना नोटीस

(BJP MLA Prashant Bamb colleagues bail plea rejected by Aurangabad bench)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें