‘शरद पवारला त्याच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा आहे का?’; सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त वक्तव्य

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या आजारपणावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "आता महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?", असा खोचक सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. त्यांच्या या टीकेवर आता शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'शरद पवारला त्याच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा आहे का?'; सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त वक्तव्य
सदाभाऊ खोत आणि शरद पवार
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 4:33 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. या प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्योराप आणि टीका-टीप्पणीच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. अनेक नेते आपल्या भाषणातून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर शाब्दिक हल्ला करत आहेत. असाच हल्लाबोल रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर अतिशय खालच्या शब्दांत टीका केली आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या आजारपणावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “आता महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?”, असा खोचक सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. “महाराष्ट्र बदलायचा आहे म्हणजे तुला कसला चेहरा पाहिजे?”, अशी देखील टीका सदाभाऊ खोत यांनी केली. जतमधील महायुतीच्या सभेत सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?

“अरे पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे?”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

“भाजप सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सन्माने उभं केलं. पहिली कर्जमाफी ही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना दिली. राज्याची तिजोरी ही गाय आहे. ती गाय शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाहिजे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाले यांनी देवेंद्र फडणवीस यांना का घेरलं? माहिती आहे का? तर ते काय म्हणत होते साहेबाला, गायीची जी कास आहे त्या कासेला चार थाणे आहेत. या अर्धा थाण वासराला पाजायचं म्हणजे आपल्याला, आणि साडेतीन थाणातलं दूध आपणच हाणायचं. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, चारही थाणे ही वासराचीच आहेत. मी सर्व दूध वासरालाच देणार. मग शरद पवार साहेबांना नऊवा महिना लागला आणि कळा सुटल्या”, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

हे सुद्धा वाचा
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.