AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thackeray vs BJP : ठाकरेंना मर्सिडीज, BMW कोणी गिफ्ट केल्या ते आम्हाला माहितीय, त्यामुळे जनाब संजय राऊत तुम्ही..भाजपचा जोरदार पलटवार

"आंब्यास दगड मारण्याची सवय सर्वांना असते. जो व्यक्ती काम करु शकतो, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. महाराष्ट्रातील14 कोटी जनता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी आहे. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठिशी कोणी नाही"

Thackeray vs BJP : ठाकरेंना मर्सिडीज, BMW कोणी गिफ्ट केल्या ते आम्हाला माहितीय, त्यामुळे जनाब संजय राऊत तुम्ही..भाजपचा जोरदार पलटवार
Sanjay Raut-Uddhav Thackeray Image Credit source: PTI
| Updated on: Jul 29, 2026 | 12:05 PM
Share

मुंबई महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी स्कॉर्पियो गाड्या घेतल्या होत्या. पण आता इनोव्हा गाड्या घ्यायचा प्रस्ताव आहे. यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान आपल्या ताफ्यामध्ये दहा-पंधरा बीएमडब्ल्यू, मर्सिडीज घेऊन फिरत असतील तर त्या रोगाची लागण खालच्या कार्यकर्त्यांना लागणारच ना. त्यावर आत भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “जनाब संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात किती BMW किती मर्सिडीज गाड्या आहेत हे एकदा महाराष्ट्राला सांगा. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात किती मर्सिडीज आहेत. आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यात किती बीएमडब्ल्यू आहेत हे एकदा महाराष्ट्राला सांगा. ते BMW, मर्सिडीजच्या खाली फिरत नाहीत” असा दावा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला.

उद्धव ठाकरे, जनाब संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करु नये. मूळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या ताफ्यात कुठल्या गाड्या होत्या?. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत, तरी त्यांच्या ताफ्यात मर्सिडीज, बीएमडब्ल्यू या गाड्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातही त्याच गाड्या आहेत. संजय राऊत हे कुणाच्या पैशातून आलं?” असा सवाल भाजपने विचारला आहे.

याचं उत्तर जनाब संजय राऊत यांनी द्यावं

“मर्सिडीज, BMW तुम्हाला कोणी गिफ्ट दिल्या याची यादी आमच्याकडे आहे. संजय राऊत तुम्हाला कोणी गाड्या गिफ्ट केल्या हे सुद्धा सगळ्यांना माहित आहे. ज्यांनी इतरांकडून BMW, मसिर्डीज गिफ्ट घेतल्या, ज्यांच्या ताफ्यात फक्त याच गाड्या असतात. उद्धव ठाकरेंकडे कुठलं पद आहे, ते जे मर्सिडीज घेऊन फिरतात. याचं उत्तर जनाब संजय राऊत यांनी द्यावं” असं भाजपने म्हटलं आहे.

देवाभाऊंच्या ताफ्यात फक्त तीन ते चार गाड्या आहेत

“आदित्य ठाकरे कुणी गिफ्ट दिलेल्या मर्सिडीज, बीएमडब्ल्यू घेऊन फिरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताफा कमी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ताफा कमी केला. आता देवाभाऊंच्या ताफ्यात फक्त तीन ते चार गाड्या आहेत. त्यात मर्सिडीज, BMW या कार नसतात. संजय राऊत तुमच्या ताफ्यातील BMW, मर्सिडीज कार कोणी गिफ्ट दिल्या, त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या” अशी मागणी भाजपने केली.

आंब्यास दगड मारण्याची सवय सर्वांना असते

पेपर फुटी प्रकरणात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर भाजप प्रवक्ता उत्तर देताना म्हणाला की, “आंब्यास दगड मारण्याची सवय सर्वांना असते. जो व्यक्ती काम करु शकतो, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. देवेंद्र फडणवीस सक्षमपणे महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहेत. त्यांना कितीही घेरण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील 14 कोटी जनता त्यांच्या पाठिशी आहे. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठिशी कोणी नाही”

Follow Us
हि शान कोणाची? लालबागच्या राजाची; राजाचं प्रथम दर्शन! व्हिडिओ बघाच
हि शान कोणाची? लालबागच्या राजाची; राजाचं प्रथम दर्शन! संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?