अनिल परब दोन महिन्यांचे पाहुणे, मंत्रिमंडळातून गच्छंती अटळ; किरीट सोमय्यांचा दावा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठं विधान केलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे केवळ दोन महिन्यांचे पाहुणे आहेत. (BJP's Kirit Somaiya demands action against Maharashtra Transport Minister Anil Parab)

अनिल परब दोन महिन्यांचे पाहुणे, मंत्रिमंडळातून गच्छंती अटळ; किरीट सोमय्यांचा दावा
किरीट सोमय्या आणि अनिल परब

बदलापूर: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठं विधान केलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे केवळ दोन महिन्यांचे पाहुणे आहेत. त्यांची मंत्रिमंडळातील गच्छंती अटळ आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. (BJP’s Kirit Somaiya demands action against Maharashtra Transport Minister Anil Parab)

किरीट सोमय्या बदलापूरमध्ये रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. परब केवळ दोन महिन्यांचेच पाहुणे आहेत. परब यांच्यावर वेगवेगळ्या घोटाळ्याचे आरोप आहेत. या सगळ्या घोटाळ्यांची विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून राज्यपालांनीही परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परब हे आता 2 महिन्यांचे पाहुणे असून सरकारनेच आता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

मराठा समाजाची फसवणूक

यावेळी मराठा आरक्षणावरून सोमय्या यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकार बनवाबनवी आणि फसवाफसवी करण्यात माहीर आहे. त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. अंतर्गत मतभेदामुळे ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाची बाजू कोर्टात व्यवस्थित मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं, असं सांगतानाच केंद्र सरकार आणि भाजप मराठा आरक्षणाच्या बाजूने असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मृत्यूचा आकडा लपवला

ठाकरे सरकार कोरोना मृत्यूचा आकडा लपवत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. एप्रिल महिन्यातील कोरोनाचे मृत्यू आणि त्यांची आकडेवारी यात मोठी तफावत असल्याचं त्यांनी सांगितलं. एकट्या सोलापूरमध्ये एप्रिल महिन्यात 1600 मृत्यू झाले, पण त्यातले फक्त 400 मृत्यू हे कोरोनामुळे झाल्याचं दाखवण्यात आलं. यामध्ये मोठा घोळ झाला असून आपण राज्यातल्या 13 महानगरांमध्ये फिरून हा घोळ समोर आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाकरे सरकार कोरोनाच्या काळात फक्त भ्रष्टाचार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. (BJP’s Kirit Somaiya demands action against Maharashtra Transport Minister Anil Parab)

 

संबंधित बातम्या:

केंद्र सरकारचे 2 निर्णय चांगले, 4 निर्णय अतिशय वाईट, मोदींनी विश्वास गमावला; अरविंद सावंतांची टीका

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांचा 8.30 वा जनतेशी संवाद, काय बोलणार याकडे जनतेचं लक्ष

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनात साडेबारा हजार कोटी रुपयांचे रोजगार गेले, पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका

(BJP’s Kirit Somaiya demands action against Maharashtra Transport Minister Anil Parab)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI